शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'असा' आहे Shark Tank India चे जज Ashneer Grover यांचा बंगला; फोटो पाहून म्हणाल, कमाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 8:23 PM

1 / 9
सध्या 'भारत पे'चे (BharatPe) सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) खूप चर्चेत आहेत. शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये भारतपेचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या उपस्थितीनं त्यांना एक सेलिब्रिटीच बनवलंय.
2 / 9
फोर्ब्स मॅगझिननुसार, अशनीर ग्रोव्हर यांची एकूण संपत्ती २१,३०० कोटी रुपये आहे. अशनीर यांचा विवाह माधुरी जैन यांच्यासोबत झाला आहे. माधुरी यादेखील एक उद्योजिका आहेत.
3 / 9
अशनीर आणि माधुरी यांना दोन मुलंही आहेत. अशनीर आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहतात आणि अनेकदा आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात.
4 / 9
सोशल मीडियावर अशनीरर ग्रोव्हर यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये आलिशान घराची थीम हलकी बेज असल्याचं दिसून येत आहेत. तर घराच्या आत आर्टवर्कही आहे. बेडरूममध्ये लाकडी फ्लोरिंगही आहे आणि एका खोलीत मेटल फ्रेमसह एक मोठा चार-पोस्टर बेड आहे.
5 / 9
तर दुसरीकडे अशनीर यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलांसाठी टीव्ही एरिया कशाप्रकारे डिझाईन केला आहे, हेदेखील पाहू शकता.
6 / 9
आर्टलव्हर असलेल्या अशनीर यांच्या घरात अनेक पेंटिंग्ज आणि इतर कलाकृती आहेत, ज्यामुळे ते घर अधिकच उठून दिसतं. ३९ वर्षीय अशनीर यांना कार्सचीदेखील आवड आहे.
7 / 9
अनेकदा ते आपल्या लक्झरी कार कलेक्शनमधील फोटो शेअर करत असतात. सोशल मीडियावरी त्यांच्या पोस्टनुसार त्यांच्या कार कलेक्शनमध्ये एक पोर्श आणि एक मर्सिडीज मेबॅच आहे, या दोन्हींची किंमत १ कोटींपेक्षा अधिक आहे.
8 / 9
अशनीर ग्रोव्हर सोनी वाहिनीच्या रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियामधील शार्क म्हणजेच जज म्हणून अधिक लोकप्रिय झाले आहेत. परंतु भारत पे च्या अशनीर हे सध्या एका मोठ्या वादातही सापडले आहेत.
9 / 9
सध्या त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीशी अयोग्य भाषेत बोलत असल्याचं संभाषण आहे. यानंतर त्यांच्यावर भारत पे मधून राजीनामान्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. परंतु ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
टॅग्स :businessव्यवसाय