shopping from sbi yono app to get 70 percent discount on fashion brands
शॉपिंग प्रेमींसाठी SBI ची धमाकेदार ऑफर; YONO वरुन ऑर्डर करा अन् 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 4:06 PM1 / 9शॉपिंग करायला अनेकांना आवडतं. ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना अनेक ऑफर्स देत असतात. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट, Apps वर सेल सुरू असतात. जर तुम्हालाही नवीन कपड्यांची खरेदी करायची असेल, तर तुमची आवडती बँक SBI ने धमाकेदार ऑफर (SBI Offer) आणली आहे. 2 / 9SBI चं बँकिंग App YONO द्वारे ऑर्डर केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. SBI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तुम्हाला टॉप फॅशन ब्रँड्सवर अनेक डिस्काउंट डील मिळतील. 3 / 9तुम्ही YONO App द्वारे ऑर्डर केल्यास तुम्हाला ब्रँडनुसार मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. यावर ग्राहकांना तब्बल 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. बँकेने ट्वीटमध्ये सांगितले आहे की एसबीआय आता ग्राहकांना बँकिंग आणि लाईफस्टाईल मजा दोन्ही देईल.4 / 9ग्राहकाला सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याचे YONO App डाउनलोड करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचे App गुगल प्ले स्टोअरवरूनही डाउनलोड करू शकता. 5 / 9तुमच्या मोबाइल नंबरद्वारे नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला App मधूनच Titan, Lifestyle, Trends, Azio, Biba सारख्या ब्रँडमधून खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला Trends वर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.6 / 9आपल्या ट्वीटमध्ये, SBI ने लिहिले आहे की, जे ग्राहक YONO App द्वारे वेगवेगळ्या ब्रँडसाठी खरेदी करतात त्यांना App वर उपलब्ध असलेल्या सर्व सवलतींसह स्वतंत्रपणे बचत करण्याची संधी दिली जाईल.7 / 9जे ग्राहक SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे Appवर खरेदीसाठी पैसे देतात त्यांना स्वतंत्र सूट आणि रिवॉर्ड्स देखील दिली जातील. बँकेच्या या ऑफरचा थेट करोडो ग्राहकांना फायदा होऊ शकतो.8 / 9SBI त्यांच्या YONO App द्वारे ग्राहकांना वेळोवेळी अनेक ऑफर देते. YONO वर कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना व्याजदर माफ केले जातात, तर प्री अप्रुव्ह कर्जाची सुविधा देखील आहे. 9 / 9अलीकडेच, SBI ने YONO App द्वारे डिमॅट खाते उघडणाऱ्या व्यक्तीला शुल्क भरण्यापासून सूट दिली होती. SBI ने आता हे App बँकिंग सेवेच्या पलीकडे जाऊन खरेदीच्या सोयीसाठी उघडले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications