शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Short Term Investment: १ वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर 'हे' पर्याय ठरतील बेस्ट; पाहा वर्षभरात किती मिळतो रिटर्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:32 AM

1 / 8
आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसत आहेत. भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहेच. परंतु आर्थिक तज्ज्ञ त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचा समावेश करण्याविषयी सांगत असतात.
2 / 8
कठीण काळात तुम्ही शॉर्ट टर्म गुंतवणुकीचे पैसे केव्हाही वापरू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं दीर्घकाळ सुरू केलेल्या योजना बंद करण्याची गरज भासणार नाही. जर तुम्हाला अल्पमुदतीची गुंतवणूक करायची असेल तर वर्षभराच्या गुंतवणूकीसाठी कोणते पर्याय बेस्ट आहेत हे जाणून घेऊ.
3 / 8
एफडी - एकरकमी रक्कम जमा करायची असेल तर एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय निवडू शकता. गुंतवणुकीचे सर्व पर्याय असूनही एफडी हा अत्यंत पसंतीचा पर्याय मानला जातो. तुम्ही कोणत्याही बँकेत ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत एफडी सेवेचा लाभ घेऊ शकता. व्याजदरही वेगवेगळ्या कालावधीनुसार बदलत असतो. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला १ वर्षापासून ५ वर्षांपर्यंत एफडीचा पर्यायही मिळतो, तुम्ही तो निवडूही शकता. एफडीपूर्वी बँका आणि पोस्ट ऑफिसच्या व्याजदरांची तुलना करा, त्यानंतर एक वर्षासाठी एफडीचा विचार करा.
4 / 8
डेट म्युच्युअल फंड - जर तुम्हाला एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर डेट म्युच्युअल फंडाचा पर्यायही निवडू शकता आणि त्यात १२ महिन्यांसाठी पैसे गुंतवू शकता. डेट फंडात तुम्ही जी काही गुंतवणूक करता ती सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते. साधारणपणे डेट फंडांची मॅच्युरिटी डेट ठरलेली असते. यात तुम्हाला खूप चांगला परतावाही मिळू शकतो.
5 / 8
कॉर्पोरेट एफडी - अनेक कंपन्या आपल्या व्यवसायासाठी बाजारातून पैसे गोळा करतात आणि त्यासाठी त्या कंपन्या एफडी जारी करतात. बँक एफडीप्रमाणेच हे काम करतं. यासाठी कंपनीकडून फॉर्म जारी केला जातो, जो ऑनलाइनही भरता येतो. कॉर्पोरेट एफडीमधील व्याजदर बँक एफडीपेक्षा जास्त असतो. बँक एफडीपेक्षा कॉर्पोरेट एफडीच्या बाबतीत जोखीम थोडी जास्त आहे. पण मोठ्या आणि उच्च दर्जाच्या कंपन्यांच्या एफडीमध्ये जोखीम कमी असते. सर्वसाधारणपणे कॉर्पोरेट एफडीचा मॅच्युरिटी पीरियड १ ते ५ वर्षांचा असतो. आपण आपल्या सोयीनुसार कोणताही कालावधी निवडू शकता. उच्च रेटिंग असलेल्या कंपन्या कॉर्पोरेट एफडीवर ९.२५% ते १०.७५% पर्यंत व्याज देतात.
6 / 8
रिकरिंग डिपॉझिट - दर महिन्याला थोडे पैसे गुंतवायचे असतील तर रिकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडू शकता. ही योजना एक प्रकारच्या पिगी बँकेसारखी आहे, ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. मॅच्युरिटी झाल्यावर व्याजासह एकूण रक्कम मिळते. आरडीमध्येही तुम्ही १ वर्षापासून वेगवेगळ्या पीरियडचा पर्याय निवडू शकता. तुम्हाला सर्व बँकांमध्ये आरडीची सुविधा मिळेल. सर्व बँकांमधील आरडीवरील व्याजदराची तुलना करा आणि जिथे जास्त व्याज मिळेल तेथे पैसे गुंतवा. पोस्ट ऑफिसमध्ये आरडीचा पर्यायही मिळतो, पण तिथे त्याचा कालावधी ५ वर्षांचा असतो.
7 / 8
एसआयपी - तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॉर्ट टर्मसाठीही एसआयपी बाजारात सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार दरमहिन्याला ठराविक रक्कमही जमा करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ही एसआयपी बंद करून तुम्ही तुमचे पैसे वापरू शकता. एसआयपीला सर्व योजनांपेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. साधारणपणे त्याचा सरासरी परतावा १२ टक्के असल्याचं तज्ज्ञ मानतात. पण बाजार जोडलेला असल्यानं त्यात जोखीम असते, त्यामुळे परताव्याची शाश्वती देता येत नाही.
8 / 8
टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा