Significant changes made by RBI regarding FD There will be a big impact on the amount of interest
FD बाबत RBI नं केले महत्त्वाचे बदल; व्याजाच्या रकमेवर होणार मोठा परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 9:21 PM1 / 10जर तुम्ही आपल्या बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (TD/FD) केलं असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँकेनं एफडीवरील व्याजाबाबत असलेल्या सध्याच्या नियमात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.2 / 10फिक्स्ड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिटच्या मॅच्युरीटीनंतर अनक्लेम्ड रक्कमेवरील व्याजाबाबतच्या नियमांबाबत रिझर्व्ह बँकेने काही बदल केले आहेत. 3 / 10हे सर्व बदल कमर्शिअल बँक, स्मॉल फायनॅन्स बँक, लोकल एरिया बँक आणि को-ऑपरेटिव्ह बँकांवर लागू होणार आहेत.4 / 10रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार एफडीच्या मॅच्युरिटीनंतर अनक्लेम्ड अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाची समीक्षा करण्यात आली होती. 5 / 10एफडीमध्ये मॅच्युरिटीनंतर अमाऊंट क्लेम केला गेली नाही तर ती बँकांकाडे अनक्लेम्ड अमाऊंटच्या रुपात राहते, तर त्यावर व्याज दर सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबानं किंवा मॅच्युअर्ड एफडीवरील व्याज जे कमी असेल ते देण्यात येईल.6 / 10सध्याच्या नियमानुसार जर फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी पूर्ण झाली त्याचं क्लेम केलं नाही तर ती अनक्लेम्ड अमाऊंटच्या रुपात राहते. यावर बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवरील व्याजाप्रमाणे व्याज देण्यात येतं.7 / 10फिक्स्ड डिपॉझिट ही अमाऊंड बँकेत एका निश्चित कालावधीसाठी ठराविक व्याजावर ठेवण्यात येते. यामध्ये रिकरिंग, कम्युलेटिव्ह, एन्युटी, रिईन्व्हेस्टमेंट डिपॉझिट आणि कॅश सर्टिफिकेट डिपॉझिट यांचा समावेश आहे. 8 / 10नव्या नियमांनुसार जर अनक्लेम्ड एफडी प्रकरणी जर मॅच्युअर्ड एफडीवर निर्धारित व्याज दर सेव्हिंग अकाऊंटपेक्षा मिळाणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला फायदा होईल आणि कमी असेल तर तुम्हाला नुकसान होईल.9 / 10जर तुम्हाला एफडीच्या माध्यमातून इनकम झालं तर तुम्हाला टॅक्स स्लॅबच्या हिशोबानं टॅक्स द्यावा लागतो. 10 / 10भारतात एफडीकडे निश्चित रुपानं मिळाणारा फायदा म्हणून पाहिलं जातं. पारंपारिक रुपानं म्हणजेच आजही अनेक लोकं एफडीलाच प्राधान्य देताना दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications