शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Debit and Credit Card: सिल्व्हर, गोल्ड की प्लॅटिनम… तुमच्याकडे कोणतं आहे डेबिट-क्रेडिट कार्ड, पाहा यातील फरक आणि फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 2:59 PM

1 / 10
आजच्या डिजिटल युगात पैशांच्या व्यवहारापासून ते खरेदीपर्यंतचे मार्ग बदलले आहेत आणि ऑनलाइन बँकिंगपासून ते सर्व प्रकारचे डेबिट (Debit) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) बँका देत आहेत. यामध्ये ग्राहकांना विविध श्रेणींमध्ये विविध सुविधांसह ही कार्ड दिली जातात.
2 / 10
देशात व्यवहारांसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर सातत्यानं वाढत आहे. आता बँक खातं (Bank Account) उघडताच, तुम्हाला डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आपोआप जारी केले जातात.
3 / 10
बँक खातं उघडताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार सिल्व्हर, गोल्ड कार्ड किंवा प्लॅटिनम कार्ड देखील निवडू शकता. दरम्यान, बहुतेक ग्राहकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते, म्हणून ते बँकेनं दिलेलं बाय डीफॉल्ट कार्ड वापरत असतात.
4 / 10
वेगवेगळ्या कार्ड्सच्या स्वतःच्या वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा असतात. आज आम्ही तुम्हाला अशा सर्व कार्ड्सची सविस्तर माहिती देत ​​आहोत. जेणेकरून क्रेडिट किंवा डेबिट कार्ड घेताना तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणत्या प्रकारची निवड करावी हे तुम्हाला समजेल.
5 / 10
सर्व प्रथम, क्लासिक कार्डबद्दल जाणून घेऊ. क्लासिक कार्ड हे एक अतिशय बेसिक कार्ड आहे. या कार्डवर तुम्हाला जगभरातील सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा मिळतील. याशिवाय, तुम्ही तुमचं कार्ड तुम्ही कधीही बदलू शकता आणि आपात्कालिकन परिस्थितीत तुम्ही ॲडव्हान्स्‍ड पैसे काढू शकता.
6 / 10
व्हिसा सिल्व्हर कार्ड अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्याबरोबरच पैसे फेडण्याच्या सुविधेतही लवचिकता हवी आहे. यात ९० टक्क्यांपर्यंत ॲडव्हान्स्ड कॅश लिमिटची सुविधा असते.
7 / 10
तुमच्याकडे गोल्ड व्हिसा कार्ड असल्यास, तुम्हाला ट्रॅव्हल असिस्टन्स, व्हिसाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. हे कार्ड जगभरात स्वीकारले जाते. या कार्डला ग्लोबल एटीएम नेटवर्कचा लाभ मिळतो. म्हणजेच हे कार्ड तुम्ही जागतिक स्तरावर वापरू शकता. याशिवाय जगभरातील रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर या कार्डचा वापर करून तुम्ही अनेक सवलती मिळवू शकता.
8 / 10
प्लॅटिनम कार्ड देखील गोल्ड कार्डप्रमाणे जगभरात स्वीकारलं जाते. तुम्हाला कॅश डिस्बर्समेंटपासून ग्लोबल एटीएम नेटवर्कपर्यंत सुविधा मिळतात. याशिवाय, तुम्हाला वैद्यकीय आणि कायदेशीर संदर्भ आणि सहाय्य मिळते. तसेच, हे कार्ड वापरून तुम्ही अनेक डील्स, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधा मिळवू शकता.
9 / 10
सिग्नेचर कार्डावर तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. यामध्ये एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेसचादेखील समावेश आहे.
10 / 10
मास्टरकार्डचे तीन प्रकारचे डेबिट कार्ड खूप लोकप्रिय आहेत. यात स्टँडर्ड डेबिट कार्ड, एन्हांस्ड डेबिट कार्ड आणि वर्ल्ड डेबिट मास्टरकार्ड यांचा समावेश आहे. जेव्हा तुम्ही खातं उघडण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला बँकेकडून एक स्टँडर्ड डेबिट कार्ड दिलं जाईल.
टॅग्स :businessव्यवसायbankबँक