शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोट्यधीश बनण्याचा सोपा फॉर्म्युला, केवळ ₹२००० पासून गुंतवणूकीची सुरुवात करा; बनाल करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 9:08 AM

1 / 8
Crorepati Tips: सामान्य पगार मिळणाऱ्या व्यक्तीसाठी कोट्यधीश बनणं हे स्वप्नासारखं असतं, कारण सगळी कमाई जबाबदाऱ्या आणि गरजा पूर्ण करताना खर्च होते. त्यामुळे महिन्याला दोन ते तीन हजार रुपयांची बचत झाली तरी त्याचं काय करणार? तुम्हालाही असं वाटत असेल तर आता हा विचार बदलून टाका.
2 / 8
आम्ही तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं कोट्यधीश होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकतं. यासाठी जास्त बचत करण्याची गरज नाही. जर तुम्ही फक्त २००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली तर काही वर्षांतच तुम्ही कोट्यवधींचे मालक व्हाल आणि तुम्ही आनंदानं पुढील आयुष्य जगू शकाल.
3 / 8
कोट्यधीश होण्याचा हा फॉर्म्युला ५५५ चा आहे. या सूत्राचा अवलंब करून गुंतवणुकीची सुरुवात वयाच्या २५ व्या वर्षापासून करावी लागते. यामध्ये तुम्हाला सलग ३० वर्षे गुंतवणूक करावी लागते आणि दरवर्षी या गुंतवणुकीच्या रकमेत 5 टक्के वाढ करावी लागते.
4 / 8
वयाच्या २५ व्या वर्षी जेव्हा तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करता आणि गुंतवणुकीच्या रकमेत दरवर्षी ५ टक्क्यांनी सातत्याने वाढ करता, सलग ३० वर्षे असं केल्यावर तुमचं वय ५५ वर्षे होते. ५५ वर्षे सातत्यानं ५ टक्के दराने गुंतवणूक वाढविण्याच्या या धोरणाला ५५५ फॉर्म्युला म्हणतात.
5 / 8
जर तुम्ही ५५५ ची रणनीती स्वीकारून २००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही स्वत:ला करोडपती बनवू शकता. यासाठी तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षापासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. एसआयपी ही अशी योजना आहे ज्यात अलीकडच्या काळात खूप चांगला परतावा मिळाताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते एसआयपीमध्ये सरासरी परतावा १२ टक्के आहे. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता.
6 / 8
जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी २००० रुपयांपासून एसआयपी सुरू केली आणि दरवर्षी ५% दरानं त्यात वाढ केली तर ३० वर्षात तुम्ही एकूण १५,९४,५३२ रुपयांची गुंतवणूक कराल. पण तुम्हाला १२ टक्के दरानं ८९,५२,२८० रुपये व्याज म्हणून परतावा मिळेल.
7 / 8
अशा प्रकारे वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही एकूण १,०५,४६,८१२ रुपयांचे मालक व्हाल. जर तुम्ही या फॉर्म्युल्यासह ५००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही २,६३,६७,०३० रुपयांचे मालक व्हाल. आपण आपल्या उत्पन्नानुसार गुंतवणुकीची रक्कम निवडू शकता.
8 / 8
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. एसआयपीमधील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते . कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा