sip investment plans just invest 1500 rupees per month sip will give 50 lakh rupees in 30 years
SIP मध्ये केवळ १५०० रुपयांची गुंतवणूक करा; मिळवा ५० लाखांपर्यंतचा परतावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 8:27 PM1 / 15कोरोनाच्या काळात अनेक स्तरांवर, क्षेत्रांमध्ये परिस्थिती गंभीर झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसत आहे. (sip investment plans)2 / 15संकटकाळी पैसे उपयोगी पडावेत, यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गुंतवणूक करत असतात. आताच्या घडीला गुंतवणुकीसाठी अनेकविध पर्याय आपल्याकडे उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. 3 / 15एफडीपासून म्युचुअल फंडापर्यंत अनेक प्रकारच्या पद्धतीने एखादी व्यक्ती गुंतवणूक करू शकते. यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) चांगला पर्याय असल्याचे सांगितले जाते. 4 / 15गुंतवणुकीवर जर अधिक परतावा हवा असेल तर गुंतवणूकदारांनी डोळे उघडे ठेवून गुंतवणूक करायला हवी, असे सल्लागारांचे म्हणणे आहे. SIP मधून गुंतवणूककारांना काही वर्षात चांगली बचत करता येऊ शकते.5 / 15SIP मध्ये किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. मात्र, गुंतवणूक योजना निवडताना गुंतवणूकदाराने विशेष लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात. 6 / 15SIP कॅल्युलेटरनुसार दरमहा १ हजार रुपयांची गुंतवणूक केली; तर, २० वर्षात २० लाख रुपये कमाई करू शकते. दरवषी १२ टक्के व्याज येथे गृहीत धरण्यात आले आहे.7 / 15SIP करताना मोठी रक्कम गुंतवण्याची आवशक्यता नाही. छोट्या रकमेनेसुद्धा सुरवात करता येऊ शकते. केवळ १०० रुपये गुंतवणूक करूनही SIP सुरू करता येऊ शकते. 8 / 15परंतु, SIP सुरू करायची असल्यास दरमहा किमान ५०० रुपयांची गुंतवणूक नियमितपणे करायला हवी, असे सांगितले जाते. 9 / 15SIP मध्ये किमान २० वर्ष इतकी रक्कम गुंतवणूक केल्यास २० वर्षांपर्यंत ५ लाख रुपये होतील आणि ३० वर्षाअखेर ती १७.६४ लाख रुपये होईल, असे तज्ज्ञ सल्लागारांकडून सांगितले जाते. 10 / 15SIP कॅल्युलेटरनुसार, तुम्हाला ५० लाखांचा निधी जमवायचा असेल, तर थोडी जास्त रक्कम गुंतवणूक करायला हवी. दर महिन्याला १५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास पुढील ३० वर्षात तुमची एकूण गुंतवणूक रक्कम ५० लाखांच्या आसपास पोहोचेल.11 / 15SIP कॅल्युलेटरनुसार १५०० रुपयांची एसआयपी सलग ३० वर्षे सुरु ठेवली तर जवळपास ५३ लाख रुपये मुदतपूर्तीला तयार होतील, असे म्हटले जाते. 12 / 15SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटच्या तुलनेत अधिक परतावा मिळतो, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. 13 / 15आताच्या घडीला रिकरिंग डिपॉझिटवर सरासरी ५ ते ६ टक्के व्याज मिळते. तर SIP केल्यास वर्षाला सरासरी १२ टक्के परतावा मिळत आहे.14 / 15म्युच्युअल फंडांची गुंतवणूक थेट शेअर बाजारात होते. त्यामुळे SIP योजनांमधील परतावा देखील शेअर बाजाराशी निगडित असतो. 15 / 15जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो तेव्हा चांगला परतावा मिळतो. जेव्हा बाजारात मंदी असते तेव्हा परतावा कमी मिळतो. त्यामुळे यातील गुंतवणूक रिस्की मानली जाते. योग्य विचार करूनच गुंतवणूक करावी, असा सल्ला देण्यात येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications