SIP or Lumpsum in Mutual Funds, Which Investment is Right? Know the pros and cons
Mutual Funds मध्ये SIP की Lumpsum, कोणती गुंतवणूक योग्य? जाणून घ्या फायदे-नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 4:02 PM1 / 6 Mutual Funds: आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, त्यापैकी म्युच्युअल फंड खूप लोकप्रिय आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती लंपसम आणि एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकते. परंतु लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, या दोघांमध्ये सर्वोत्तम पर्याय कोणता आहे. SIP आणि Lumpsum या दोन्हींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत.2 / 6 तुमच्यापैकी अनेकजण Mutual Funds मध्ये गुंतवणूक करत असेल किंवा करण्याच्या विचारात असेल. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे SIP आणि Lumpsum, असे दोन पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही पर्यायांचे फायदे आणि नुकसान सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही गुंतवणूकीची योग्य पद्धत निवडू शकता.3 / 6 एसआयपीद्वारे गुंतवणूक: फायदे-SIP द्वारे गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदाराला बाजारातील सर्व कालमर्यादेचा(टाईमफ्रेम) लाभ मिळतो. ही गुंतवणूक EMI प्रमाणेच आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंड योजनेत हप्ता म्हणून गुंतवली जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. यामुळे दीर्घकालीन चक्रवाढीचाही फायदा होतो.4 / 6 एसआयपीद्वारे गुंतवणूक: तोटा-दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी अधिक प्रभावी आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपी केवळ एका निश्चित तारखेला सुरू होते. अनेक वेळा विलंब, दंड आदी भरावे लागतात. एसआयपी स्थिर उत्पन्न असलेल्या लोकांसाठी चांगली आहे.5 / 6 लंपसम गुंतवणूक: फायदे- एकरकमी गुंतवणुकीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही बाजारातील परिस्थितीनुसार गुंतवणूक करू शकता. तुम्ही याचा वापर करून अल्पावधीत नफा मिळवू शकता. जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी मोठी गुंतवणूक करायची असेल आणि तुमचे उत्पन्न अस्थिर असेल तर Lumpsum हा एक चांगला मार्ग असू शकतो.6 / 6 लंपसम गुंतवणूक: तोटा-एकरकमी गुंतवणुकीचा तोटा हा आहे की, तुम्ही मार्केट टाइमफ्रेमचा फायदा घेऊ शकत नाही. याचा परिणाम तुमच्या परताव्यावर होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications