शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

2500 रुपयांच्या SIP ने व्हाल करोडपती, जाणून घ्या SBI च्या 'या' योजनेचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 7:15 PM

1 / 6
SIP Scheme: गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीबाबत भारतीयांची मानसिकता बदलू लागली आहे. फक्त बँकेत पैसे ठेवण्याऐवजी, लोक आता विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. विशेषत: म्युच्युअल फंड किंवा एसआयपीमधील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये अधिक उत्साह दिसून येतोय.
2 / 6
याचे कारण म्हणजे, हे गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत बनवत आहेत. आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका SIP योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने 2500 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
3 / 6
आम्ही ज्या SBI योजनेबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव SBI Healthcare Opportunities Fund आहे. तुम्ही या योजनेत दरमहा 2500 रुपये गुंतवले, तर तुम्हाला 25 वर्षांत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा परतावा मिळेल. या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 18 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षाच्या रिटर्नबद्दल बोलायचे, तर हा 37 टक्के आहे.
4 / 6
आता 2500 रुपयांची गुंतवणूक 25 वर्षांत 1 कोटी रुपयांहून अधिक कशी झाली हे समजून घेऊ. जर तुम्ही या योजनेत 25 वर्षे दरमहा 2500 रुपये गुंतवले, तर तुमची एकूण गुंतवणूक 7.50 लाख रुपये होईल. या रकमेवर परतावा आणि व्याज जोडले तर 25 वर्षांत ही रक्कम 1.10 कोटी रुपये होते.
5 / 6
SBI हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड 5 जुलै 1999 रोजी लॉन्च करण्यात आला होता. उच्च जोखीम श्रेणीची ही योजना आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करते. आरोग्य सेवा क्षेत्रात या निधीचे वाटप सुमारे 93.23 टक्के आहे. याशिवाय रासायनिक आणि इतर क्षेत्रातही त्याचे वाटप आहे. तुम्हाला आता गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही करू शकता. तुम्ही ही गुंतवणूक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता.
6 / 6
(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :businessव्यवसायSBIएसबीआयInvestmentगुंतवणूक