शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Save Money Tips: कमीवेळात जास्त सेव्हिंग करण्याचे 'हे' आहेत स्मार्ट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 4:58 PM

1 / 10
सब्सक्रिप्शन शेअर करा आपल्या सर्वांना आता OTT प्लॅटफॉर्मचे मूल्य माहीत आहे. आपल्याकडे कितीही अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन असलं तरी आपल्याला माहीत आहे की, आपण दोनपेक्षा जास्त अ‍ॅप्स पाहू शकत नाही. आपल्याकडे इतका वेळच नसतो. पैसे वाचवण्यासाठी आपण पाहत असलेल्या प्लॅटफॉर्मची सब्सक्रिप्शन घ्यावं आणि दुसरा उपाय म्हणजे तुमच्या मित्रांसह सब्सक्रिप्शन शेअर करावी म्हणजे दोघांचेही पैसे वाचतात.
2 / 10
आपल्या सर्वांना कधी ना कधी बाहेरून जेवण मागवावं लागतं, पण जर तुम्ही आठवड्यातील दोन दिवस काही खास पदार्थ घरीच बनवायचे ठरवले तर तुम्हाला बाहेरचे काही खाण्याची फारशी इच्छा होणार नाही. तुमची लालसाही शांत राहील आणि तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. अनेकांच्या हे लक्षात येत नाही, मात्र बाहेर खाण्यामध्ये खूप पैसे खर्च होतात.
3 / 10
ऑनलाइन खरेदी ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, आपण खरेदी का करीत आहात हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे? अनेक लोक जेव्हा दुःखी, उदास असतात तेव्हा खरेदी करत सुटतात. परंतु, आपण आपल्या गरजेनुसार खरेदी करणं केव्हाही चांगलं आहे. तुम्ही खरेदीसाठी किमती खाली येण्याची प्रतिक्षादेखील करू शकता.
4 / 10
क्रेडिट कार्ड वापरू नका सामान्यतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्ही नंतर पैसे भरण्याच्या नावाखाली खूप खर्च करता, त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम वापरा, म्हणजे खर्च करताना हात आपोआप आखडता घेतला जातो.
5 / 10
असे अनेकजण आहेत जे कोणतीही बिलं वेळेत न भरल्याने महिन्याला सर्व बिलांवर अंदाजे ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा दंड भरतात मग ते फोनचे बिल असो, लाईटचे, गॅसचे किंवा पाण्याचे. मात्र वेळेत बिलं भरण्याची सवय लावून महिन्याला ५०० रुपये जरी वाचवले तरी खूप फायदा महिन्याच्या बजेटमध्ये होऊ शकतो मात्र दीर्घ गुंतवणूक केली तर लाखो रुपये परतही मिळतात. म्हणजे ५०० रुपये प्रती महिना आठ टक्क्यांच्या दराने ४० वर्षांसाठी गुंतवल्यास तुम्हाला ४० वर्षांनतर १७ लाख रुपये मिळतील.
6 / 10
हवेत पैसा उडवण्याचे माध्यम म्हणजे धुम्रपान. पैशांशिवाय आरोग्याला होणारी हानी आलीच. १० रुपयांची एक प्रमाणे दिवसाच्या २० सिगारेटचे पैसे सिगारेटवर न उडवता बाजूला काढून ठेवले तरी महिन्याचे सहा हजार रुपये वाचतात. प्रत्येक महिन्याला हेच सहा हजार आठ टक्के दराने गुंतवल्यास ४० वर्षांत चक्क गुंतवणूकदार दोन कोटींचा मालक होऊ शकतो.
7 / 10
पैसे वाचवण्याचा एक उपाय म्हणजे तुम्ही महिन्याचं व्यवस्थित बजेट तयार करायला हवं आणि ठरवलेल्या बजेटच्या बाहेर कधीही जाऊ नये. महिन्याच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेलं बजेट हे तुमच्या सर्व गरजा तुमच्या प्राथमिकतेनुसार नक्कीच पूर्ण करत असतं.
8 / 10
तुम्ही वाचवलेले पैसे जर योग्य तऱ्हेने अर्थात स्मार्ट उपायांनी जर गुंतवले नाहीत तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. आपण वाचवलेले पैशातून साधारण 50 टक्के पैसा अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला महागाईच्या या राक्षसापासून वाचता येईल आणि चांगले रिटर्न्स मिळतील
9 / 10
तुम्ही वाचवलेले पैसे जर योग्य तऱ्हेने अर्थात स्मार्ट उपायांनी जर गुंतवले नाहीत तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. आपण वाचवलेले पैशातून साधारण 50 टक्के पैसा अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला महागाईच्या या राक्षसापासून वाचता येईल आणि चांगले रिटर्न्स मिळतील
10 / 10
हे वाटते तितके सोप्पे नसले तरी गुंतवणूक आणि आहे तो पैसा आपल्या सवयी बदलून कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक