Snapdeal plans 350 400 million dolar IPO eyes valuation of up to 2 5 billion dollars
IPO News : Snapdeal देणार कमाईची मोठी संधी; IPO द्वारे ३ हजार कोटी जमवण्याच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 4:07 PM1 / 7ई-कॉमर्स रिटेलर स्नॅपडीलदेखील (Snapdeal) प्रायमरी मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. अहवालानुसार, कंपनी ३००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी आयपीओ (IPO) आणणार आहे. 2 / 7स्टार्टअपकडून आयपीओद्वारे पैसे जमवणाऱ्या कंपन्यांमध्ये आता स्नॅपडीलचाही नंबर लागणार आहे. आयपीओची तयारी करण्यासाठी कंपनी सल्लागारांशी चर्चा करत असून कंपनीचं मूल्यांकन २.५ अब्ज डॉलर्स पर्यंत ठेवलं जाऊ शकतं.3 / 7ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अनुभवी गुंतवणूकदार सॉफ्टबँक कॉर्प-समर्थित स्नॅपडीलच्या आयपीओची तयारी अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. तथापि, स्नॅपडील आणि सॉफ्टबँकनं त्यांच्या वतीनं अद्याप कोणतंही निवेदन जारी केलेलं नाही. हा IPO पुढील वर्षी सुरूवातीलाच येऊ शकतो.4 / 7२०१० मध्ये सुरू झालेल्या स्नॅपडीलचं मुख्यालय गुडगावमध्ये आहे. सध्या स्नॅपडीलवर ८०० कॅटेगरीतील सुमारे ६ कोटी प्रोडक्ट रजिस्टर्ड आहेत. कंपनी भारतातील ६००० हून अधिक शहरं आणि गावांमध्ये आपल्या उत्पादनाचं वितरण करते. आतापर्यंत २०२१ मध्ये सुमारे ३६ कंपन्यांनी ६०,२०० कोटी रुपयांचे IPO लाँच केले आहेत. 5 / 7अनेक स्टार्टअप्स लिस्टिंगची तयारी करत आहेत. बहुतांश फिनटेक किंवा ई-कॉमर्स उद्योगाशीच संबंधित आहेत. फिनटेक कंपनी पेटीएम, इन्शुरन्स एग्रीगेटर पॉलिसी बाजार आणि फॅशन आणि कॉस्मेटिक ई-रिटेलर नायका यांनी सेबीकडे त्यांच्या आयपीओसाठी कागदपत्रं दाखल केली आहेत.6 / 7चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत किमान १२ कंपन्यांनी आयपीओद्वारे २७००० कोटी रुपये उभारले होते. तथापि, ज्या वेगाने आयपीओ येत आहेत, त्या अंदाजानुसार असं मानलं जात आहे की कंपन्या चालू आर्थिक वर्षात आयपीओमधून किमान एक लाख कोटी रुपये उभारू शकतात. 7 / 7या वर्षी आणखी ४० आयपीओ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापैकी बहुतेक स्टार्ट-अप असू शकतात. सध्या, फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या आयपीओला मिळालेल्या प्रतिसादामुळे स्टार्ट-अपसाठी आयपीओ बाजारपेठ अधिक आकर्षक झाली असं म्हटलं जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications