शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पायपीट करत औषधं विकली, ₹२००० कर्ज घेऊ सुरू केली कंपनी; आज आहे २६०००० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 8:20 AM

1 / 9
मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली तर यशाचं कोणतंही शिखर गाठता येतं. अशा काही व्यावसायिकांबद्दल तुम्ही ऐकलंही असेल, ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. आज भारतातच नाही तर जगभरात त्यांची ओळख आहे.
2 / 9
मोठी स्वप्न पाहिली आणि त्यासाठी दिवसरात्र एक केली तर यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशीच कहाणी आहे फार्मा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप सांघवी यांची. कधी घरोघरी जाऊन औषधं विकणाऱ्या सांघवी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभा केला. त्यांच्याकडे ना मोठा बँक बॅलन्स होता ना ते कोणत्या व्यावसायिक घराण्यातून येतात.
3 / 9
ते फार्मा कंपन्यांसाठी डिस्ट्रिब्युशनचे काम करायचे. इकडे तिकडे फिरून ते औषधं विकायचे. एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला की जर मी इतरांनी बनवलेली औषधे विकू शकतो तर माझी स्वतःची औषधं का विकता येणार नाहीत.
4 / 9
१९८२ मध्ये त्यांनी वडिलांकडून २००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि आपल्या मित्रासोबत गुजरातमधील वापी येथे त्यांची फार्मास्युटिकल कंपनी सन फार्मा सुरू केली. दर्जेदार औषधांवर भर देऊन त्यांनी याची सुरुवात केली.
5 / 9
सुरुवातीला ते फक्त काही सायकॅट्रिक मेडिसिन्स बनवत असत. दिलीप यांनी आता आपली औषधे विकायला सुरुवात केली. १९९७ मध्ये १५ वर्षांनी दिलीप सांघवी यांनी अमेरिकन फार्मा कंपनी विकत घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी अमेरिकेतही या क्षेत्रात प्रवेश केला. २००७ मध्ये त्यांनी इस्रायली कंपनी तारो फार्माही विकत घेतली.
6 / 9
सन २०१४ मध्ये सन फार्मा आणि रॅनबॅक्सी यांच्यात करार झाला होता. ज्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या काही बदलले. सन फार्मानं रॅनबॅक्सीला सुमारे १९००० कोटी रुपयांना विकत घेतलं. २०१४ च्या अखेरीस, दिलीप सांघवी यांची एकूण संपत्ती १७.८ बिलियन डॉलर्सवर पोहोचली.
7 / 9
एक असाही क्षण होता जेव्हा ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले. २०१५ मध्ये, फोर्ब्सच्या यादीत, दिलीप सांघवी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले होते.
8 / 9
एक असाही क्षण होता जेव्हा ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले. २०१५ मध्ये, फोर्ब्सच्या यादीत, दिलीप सांघवी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले होते.
9 / 9
फोर्ब्सच्या मते दिलीप सांघवी यांची एकूण संपत्ती १,४६,०९० कोटी रुपये झाली. सन फार्माचे मार्केट कॅप १९ जुलै २०२३ रोजी २,६०,००० कोटी रुपयांवर पोहोचलं.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी