शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol-Diesel Price: 'या' देशात काड्यापेटीपेक्षाही स्वस्त आहे एक लीटर पेट्रोल; ५० रूपयांत फुल होते कारची टाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 2:15 PM

1 / 9
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज नवनवे विक्रम बनवत आहे.
2 / 9
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35-35 पैशांनी वाढ केली. या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 108.29 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
3 / 9
भारतात इंधनाच्या वाढत्या लोकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याची मागणी विरोधी पक्ष सरकारकडे करत आहेत. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे पेट्रोलची किंमत भारतापेक्षा जास्त आहे.
4 / 9
भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असली तरीही त्यांची किंमत देशातील इतर अनेक देशांपेक्षा कमी आहे. जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये आहे. globalpetrolprices.com च्या मते, सप्टेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत 2.56 डॉलर म्हणजे 192 रुपये प्रति लिटर होती.
5 / 9
युरोपियन देश नेदरलँड्समध्ये एक लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 2.18 डॉलर म्हणजेच 163 रुपये प्रति लिटर खर्च करावे लागत आहेत. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये पेट्रोलचा दर 160 रुपये प्रति लिटर आहे. त्याचप्रमाणे नॉर्वे, इस्रायल, डेन्मार्क, मोनॅको, ग्रीस, फिनलंड आणि आइसलँड या देशांमध्येही पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
6 / 9
जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला येथे मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला फक्त 0.02 डॉलर्स म्हणजे 1.50 रुपये खर्च करावे लागतील. हे काड्यापेटीपेक्षाही स्वस्त आहे.
7 / 9
भारतात डिसेंबर महिन्यापासून काड्यापेटीची किंमत 2 रुपये होणार. म्हणजेच, जर तुम्ही व्हेनेझुएलामध्ये असाल तर तुम्ही 50 रुपयांपेक्षा कमी किमतीत 30 लिटर पेट्रोल खरेदी करू शकता. मारुती सुझुकी अल्टो K10 ची 35 लिटरची टाकी भरण्यासाठी तुम्हाला 52.50 रुपये खर्च करावे लागतील.
8 / 9
इराणमध्ये पेट्रोलची किंमत 0.06 डॉलर्स म्हणजेच 4.51 रुपये प्रति लिटर आहे आहे. गृहयुद्धाचा सामना करणाऱ्या सीरियामध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी जवळपास 17 रुपये खर्च करावे लागतील.
9 / 9
त्याचप्रमाणे अंगोला, अल्जेरिया, कुवेत, नायजेरिया, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान आणि इथिओपियामध्ये पेट्रोलची किंमत अर्ध्या डॉलरपेक्षा कमी आहे. भारताप्रमाणेच जगातील बहुतांश देश पेट्रोलवर विविध प्रकारचे कर लावतात. सरकारच्या महसुलाचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलIndiaभारत