शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Parle-G च्या काही रंजक गोष्टी, तुम्हाला माहितीये 'G' चा अर्थ काय? Genius तर नक्कीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:28 AM

1 / 7
लहान मुलं असोत, वृद्ध असोत वा तरुण, बिस्किटांचं नाव आलं तर तोडावर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'पारले-जी'. हे नाव सगळ्यांनाच ठाऊक असेलच. तुम्हीही हे बिस्किट खात असाल तर त्याच्या रॅपरवर पाहून कधी ना कधी तुम्हाला पारले जी मधील जी चा अर्थ काय असेल असा प्रश्न मनात नक्कीच आला असेल. याला उत्तर देताना बहुतेक लोक जीनियस म्हणतील जे चुकीचं आहे. खरं तर याचा अर्थ काही वेगळाच आहे.
2 / 7
काळ बदलला असला तरी पारले जी या बिस्किटाची चव अजूनही लोकांच्या जिभेवर आहे आणि त्याला केवळ बिस्कीट ब्रँड मानणं किंवा म्हणणं योग्य नाही, कारण लोकांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. पारले-जी बिस्किटांचा उल्लेख केला की आपण आपल्या बालपणात रमतो. कालांतरानं पारले-जी बिस्किटांच्या आकारात बदल झाला, पण त्याची चव बदललेली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय आणि ब्रिटीश दोन्ही सैनिकांचं हे बिस्कीट सर्वाधिक पसंतीचं होतं.
3 / 7
पारलेच्या सुरुवातीबद्दल बोलायचं झालं तर ती १९२९ पासून झाली. नव्वदच्या दशकातील मुलांनाही त्यांचा काळ आठवत असेल, जेव्हा चहा आणि पारले जी यांचं कॉम्बिनेशन प्रसिद्ध होतं. त्यावेळी कंपनीनं त्याच्या प्रमोशनसाठी जारी केलेल्या जाहिरातीही खूप गाजल्या होत्या. इतकंच नाही तर पारले-जीच्या पाकिटावर छापलेल्या मुलीच्या फोटोबद्दल अनेक किस्से आहेत. दुसरीकडे नावाबद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं मुंबईतील विलेपार्ले भागातून पारले हे नाव घेतल्याचं म्हटलं जातं. पण आपण पारले जी मधील जी चा अर्थ काय हे पाहू.
4 / 7
१९३८ मध्ये पारले-ग्लूको (Parle-Gluco) या नावानं बिस्किटांचं उत्पादन सुरू करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यापूर्वी पारले जीचं नाव ग्लुको बिस्किट (Gluco Biscuit) होतं. मात्र, स्वातंत्र्यानंतर ग्लुको बिस्किटांचं उत्पादन बंद करण्यात आलं. खरं तर ते बनवण्यासाठी गव्हाचा वापर केला जात होता आणि त्यावेळी देशात अन्नधान्याचे संकट निर्माण झालं होतं, त्यामुळे त्याचं उत्पादन थांबवावं लागलं होतं.
5 / 7
अन्नसंकट संपल्यानंतर त्याचं उत्पादन पुन्हा सुरू झाले तेव्हा अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि बाजारात स्पर्धा वाढली होती. विशेष म्हणजे ब्रिटानियानं ग्लुकोज-डी बिस्किटांच्या माध्यमातून बाजारात आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली. मग पारलेनं ग्लूको बिस्किट पुन्हा लाँच करून त्याला 'पारले-ग्लूको' असं नवं नाव दिले, मग १९८० नंतर पार्ले ग्लुको बिस्किटाचं नाव बदलून पारले जी करण्यात आलं.
6 / 7
मात्र, २००० मध्ये 'जी' म्हणजेच 'जीनियस'ला प्रमोट करण्यात आलं हे खरं आहे. पण, खऱ्या अर्थानं पारले-जीमध्ये दिलेला 'जी' म्हणजे 'ग्लुकोज' आहे. ज्याचा उपयोग त्या काळी बाजारात ग्लुकोज बिस्किटांच्या वाढत्या व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीच होत असे आणि ते हे बिस्किट इतकं प्रसिद्ध झालं की त्याची चव आजही लोकांच्या जीभेवर आहे.
7 / 7
आज बिस्किट मार्केटवर नजर टाकली तर अतिशय मोठं झालंय. परंतु पारले जी नं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. दुसऱ्या महायुद्धाप्रमाणेत कोरोना काळातही पारले जी नं जुने सर्व विक्रम तोडले होते आणि कंपनीनुसार त्यांची विक्री ८ दशकांतील सर्वात अधिक होती, यावरून याचा अंदाज लावता येऊ शकतो.
टॅग्स :businessव्यवसायParle Gपार्ले-जी