शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गरिबीत काढले दिवस, डिलिव्हरी बॉय म्हणूनही केलं काम; आज उभी केली ५२ हजार कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 9:10 AM

1 / 7
गेल्या दशकात भारतात स्टार्टअप संस्कृती झपाट्यानं वाढली आहे. या काळात देशाला अनेक नवीन तरुण उद्योजक मिळाले. विशेष म्हणजे या तरुण व्यावसायिकांची यशोगाथा लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. आम्ही तुम्हाला अशा उद्योजकाबद्दल सांगणार आहोत ज्यानं आपल्या या प्रवासात खूप वाईट दिवसही पाहिले. जेव्हा त्यांचं कुटुंब दिवाळखोर झालं तेव्हा त्यांना डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करावं लागलं.
2 / 7
आम्ही बोलत आहोत फिनटेक कंपनी CRED ॲपचे संस्थापक कुणाल शाह यांच्याबद्दल. वाईट काळात, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांना त्यांचं कुटुंब दिवाळखोर झाल्यानंतर डिलिव्हरी एजंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करावं लागलं.
3 / 7
देशातील दिग्गज उद्योजक, इन्फो एजचे संस्थापक संजीव बिखचंदानी यांनी कुणाल शहा यांचा संघर्ष लोकांसमोर आणला. भेटीदरम्यान त्यांनी कुणाल यांच्या त्यांचं शिक्षण आणि संघर्षाबद्दल विचारलं. यानंतर त्यांनी ट्वीट करत त्यांच्या संघर्षाबद्दल माहितीही दिली.
4 / 7
देशातील अनेक स्टार्टअपचे संस्थापक आयआयटी आणि आयआयएममधून बाहेर पडले आहेत, परंतु कुणाल शाह हे असे तरुण उद्योजक आहेत, ज्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून पदवी मिळवली आहे आणि आपल्या मेहनतीनं व्यवसाय जगतात प्रसिद्धीही मिळवलीये.
5 / 7
यापूर्वी कुणाल शाह यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की, त्यांच्या कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना लहान वयातच काम करावं लागलं. ते त्यांच्या घराबाहेर सायबर कॅफेही चालवत असत. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कुणाल आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले.
6 / 7
महिन्याला आपल्याला १५ हजार रुपये पगार मिळतो, असा दावाही त्यांनी केला. CRED मध्ये पगार कमी का ठेवला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले की जोपर्यंत त्यांची फिनटेक कंपनी नफ्यात जात नाही, तोवर आपण मोठा पगार घेणार नाही.
7 / 7
स्टडी कॅफेच्या रिपोर्टनुसार, CRED चं मूल्यांकन अंदाजे ६.४ अब्ज डॉलर्स (५२ हजार कोटींहून अधिक) आहे. DNK च्या अहवालानुसार, कुणाल शाह यांची अंदाजे संपत्ती १५ हजार कोटी रुपये आहे. कुणाल शाह यांची कंपनी CRED असेट मॅनेजमेंट कंपनी कुवेराचं अधिग्रहण करणार असल्याचंही वृत्त आहे.
टॅग्स :businessव्यवसाय