शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबा रामदेव यांच्यासह 'हे' पाच आहेत देशातील श्रीमंत आध्यात्मिक गुरु, जाणून घ्या त्यांची संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:29 AM

1 / 6
योग गुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांना जाहिरातीद्वारे दिशाभूल करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळं आता बाबा रामदेव हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशातच बाबा रामदेव यांच्या एकूण संपत्तीबाबत चर्चा होऊ लागली आहे. त्यांची एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांच्यासह देशातील ५ श्रीमंत आध्यात्मिक गुरूंच्या संपत्तीबाबत जाणून घ्या...
2 / 6
योग गुरु बाबा रामदेव देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. पतंजली उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केट खुले करून दिले आहे. याशिवाय त्यांची कंपनी खाण्यापिण्यापासून इतर अनेक गोष्टी बनवते. हरियाणातील शेतकरी कुटुंबातील बाबा रामदेव यांना देखील खूप संघर्ष करावा लागला आहे. आज प्रत्येक घरात योग पोहोचवण्यात बाबा रामदेव यांचे मोठे योगदान आहे. ते पतंजली योगपीठ आणि दिव्य योग मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. दरम्यान, बाबा रामदेव यांच्याकडे किती संपत्ती आहे? याचा नेमका आकडा नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
3 / 6
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे रामकथेसाठी खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे विदेशातही अनेक चाहते आहेत. त्यांनी जगातील अनेक शहरांमध्ये जाऊन प्रवचने आणि गीता पठण केले आहे. धीरेंद्र शास्त्रीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकवेळा ते आपल्या विधानांनी चांगलेच चर्चेत येत असतात. धीरेंद्र शास्त्री हे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असल्याचेही बोलले जाते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, धीरेंद्र शास्त्री यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपये इतकी आहे.
4 / 6
ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव योगासाठी खूप प्रसिद्ध आहेत. सद्गुरु जग्गी वासुदेव यांची जगभरात अनेक योग केंद्रे, पर्यावरणीय प्रकल्प आणि शैक्षणिक संस्था आहेत. २०१७ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 / 6
केरळमध्ये सप्टेंबर १९५३ मध्ये जन्मलेल्या माता अमृतानंदमयी या हिंदू आध्यात्मिक नेता आहेत. त्यांना ‘अम्मा’ म्हणूनही ओळखले जाते. अम्मा यांचे देश-विदेशात अनेक अनुयायी आहेत. त्या अमृतानंदमयी ट्रस्टचे कामकाज पाहतात. माता अमृतानंदमयी यांच्या मालमत्तेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या ट्रस्टची मालमत्ता सुमारे १५०० कोटी रुपये इतकी आहे.
6 / 6
आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे देखील देशातील महत्वाच्या आध्यात्मिक गुरूंपैकी एक आहेत. ते योग, ध्यान इत्यादींसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगातील १०० हून अधिक देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. श्री श्री रविशंकर आपल्या प्रवचनासाठी देश आणि जगभर फिरतात. त्यांच्या फाउंडेशनसाठी अनेक देशांकडून निधी मिळतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची संपत्ती सुमारे १००० कोटी रुपये इतकी आहे.
टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाspiritualअध्यात्मिकbusinessव्यवसाय