Start a paper straw business at low cost; Earn lakhs of rupees per month, know
कमी खर्चात सुरू करा पेपर स्ट्रॉ बिझनेस; महिन्याला लाखो रुपये कमाई, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 4:09 PM1 / 10जर तुम्ही कमी खर्चात स्वत:चा उद्योगधंदा सुरू करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक शानदार उद्योग घेऊन आलो आहोत. हा उद्योग तुम्ही कमी खर्चात सुरू करून महिन्याला चांगली कमाई करू शकता. 2 / 10या उद्योगातून निर्माण होणारं उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकून तुम्हाला नफा मिळू शकतो. हा उद्योग आहे पेपर स्ट्रॉ मेकिंग(Papar Straw Making). भारतात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी आल्यापासून सध्या हा उद्योग खूप जोरात सुरू आहे. 3 / 10बाजारात पेपर स्ट्रॉच्या वाढत्या मागणीमुळे उत्पादनकर्ते या उद्योगाला चांगला नफा देणारा उद्योग मानत आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी कमी खर्चात हा उद्योग करता येईल. त्यातून तुम्ही महिन्याला लाखो रूपयेही सहजपणे कमवू शकता. 4 / 10भारतात सिंगल यूज प्लॅस्टिक(Single Use Plastic) १ जुलै २०२२ पासून बंदी आणली आहे. ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतून तुम्हाला प्लॅस्टिकच्या वस्तू गायब झालेल्या पाहायला मिळत असतील. त्यात प्लॅस्टिक स्ट्रॉचा समावेश आहे. 5 / 10पेय पदार्थासाठी स्ट्रॉची मागणी अधिक असते. सरकारच्या या निर्णयामुळे प्लॅस्टिक स्ट्रॉ ऐवजी मार्केटमध्ये पेपर स्ट्रॉची मागणीत वाढ झाली आहे. नेमका हा उद्योग कसा सुरू करायचा? त्यासाठी किती खर्च येईल? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 6 / 10KVIC नुसार, पेपर स्ट्रॉ मेकिंग उद्योगासाठी प्रोजेक्ट कॉस्ट १९.४४ लाख रुपये इतकी आहे. त्यासाठी तुम्हाला खिशातून केवळ १.९४ कोटी खर्च करावे लागतील. उर्वरित १३.५ लाख रुपये टर्म लोन घेऊ शकता. वर्किंग कॅपिटलसाठी ४ लाख फायनान्स करू शकता. 7 / 10५-६ महिन्यात हा उद्योग सुरू होऊ शकतो. उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान मुद्रा कर्जही घेऊ शकता. जेव्हा तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये कोल्ड ड्रिंक, नारळ पाणी आणि लस्सी अथवा अन्य पेय पदार्थ घेता तेव्हा स्ट्रॉचा वापर करावा लागतो. 8 / 10स्ट्रॉची मागणी छोट्या ज्यूस सेंटरपासून बड्या डेअरी कंपन्यांपर्यत असते. पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जागरुकता असल्यानं सध्या पेपर स्ट्रॉची मागणी वाढत आहे. पेपर स्ट्रॉच्या कच्च्या मालासाठी ३ गोष्टीची आवश्यकता असते. 9 / 10त्यात फूड ग्रेड पेपर, फूड ग्रेथ गम पाऊडर आणि पॅकेजिंग मटेरियलची गरज लागते. त्याशिवाय एक पेपर स्ट्रॉ मेकिंग मशिन(Paper Staraw Making Machine) हवी. ज्याची किंमत जवळपास ९ लाख रुपयांपर्यंत असते. 10 / 10पेपर स्ट्रॉ मेकिंग बिझनेसमध्ये लाखो कमाई करू शकता. जर तुम्ही ७५ टक्के क्षमतेसह पेपर स्ट्रॉ बनवण्याचं काम सुरू केले तर तर तुमचा Gross Sale ८५.६७ लाख रुपये असेल. त्यात सर्व खर्च आणि टॅक्स वजा केल्यानंतर ९.६४ लाख रुपये वार्षिक कमाई असेल. याचा अर्थ महिन्याला ८० हजाराहून अधिक कमाई होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications