शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करा आणि १ कोटींहून अधिकचा रिटर्न मिळवा, जाणून घ्या कसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 8:18 AM

1 / 9
गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी काही बक्कळ रकमेची गरज नसते. जर तुम्ही दरमहिन्याला नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवली तरी मोठ्या प्रमाणात पैसे साठू शकतात. जर तुम्हाला घर, गाडी मुलांचे शिक्षण, विवाह किंवा निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी काही नियोजन करत असाल तर त्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीच्या मार्गावरून चालावे लागेल.
2 / 9
गुंतवणुकीबाबत अनेक जण सांगतात की, काही काळानंतर आम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू मात्र त्यांच्यासाठी ती वेळ कधीही येत नाही. कारण अशा व्यक्ती गुंतवणुकीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आजच्या घडीला बचतीवर लक्ष केंद्रीत करणे जेवढे आवश्यक आहे तेवढीच गुंतवणुकीबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मात्र गुंतवणूक कुठे करावी, हा प्रश्न उभा राहतो.
3 / 9
गुंतवणुकीमधून चांगले रिटर्न मिळण्यासाठी आजच्या काळात वित्त सल्लागार गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. कुठल्याही वयाचे लोक म्युच्युअल फंडामध्ये SIP करू शकतात. मात्र कमी वयामध्ये गुंतवणुकीची सुरुवात केल्यावर हे लक्ष्य आरामात गाठले जाऊ शकते.
4 / 9
बँक खात्यांमध्ये सातत्याने घटत असलेल्या व्याजामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा पर्याय एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. म्युच्युअल फंडामधील SIP तीन पद्धतीने सुरू करता येऊ शकते. पहिला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड एजंटच्या माध्यमातून, दुसरा पर्याय ब्रोकरकडून ऑनलाइन ट्रेंडिंग अकाऊंट उघडून. तिसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडाच्या डायरेक्ट फंडामध्ये गुंतवणूक करावी. त्यासाठी म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन गुंतवणूक करता येऊ शकते.
5 / 9
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. या माध्यमातून गुंतवणूक केल्यावर चांगला रिटर्न मिळणे सोपे होते. SIP च्या माध्यमातून कुठल्याही डायवर्सिफाइड म्यच्युअल फ्ंडामध्ये गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडामध्ये ५०० रुपये दरमहा एवढ्या रकमेपासून गुंतवणुकीची सुरुवात करता येऊ शकते. म्हणजेच म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते.
6 / 9
जर तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल तर तुम्हाला गुंतवणूक दर महिन्याला सुरू ठेवावी लागेल. त्याशिवाय उत्पन्नात वाढ झाल्यावर गुंतवणुकीची रक्कमही वाढवावी लागेल. उदाहरण द्यायचं झाल्यास जर कुठल्याही २५ वर्षांच्या तरुणाने ५०० रुपयांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला सुरुवात केली. तर त्याने दर सहा महिन्यांनी किमान ५०० रुपयांची गुंतवणूक वाढवली पाहिजे. त्यामुळे पाच वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणुकीची रक्कम वाढून ५ हजार रुपये होईल. हे शक्य आहे. कारण नोकरदार व्यक्तींचा पगार दरवर्षी वाढतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या दोन वर्षांतील रिटर्न पाहाल तेव्हा गुंतवणुकीबाबतचा तुमचा उत्साह वाढेल.
7 / 9
उदाहरण द्यायचं झाल्यास जर कुणी ३० वर्षांच्या वयात म्युच्युअल फंडामध्ये पुढील ३० वर्षांपर्यंत दर महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला ६० वर्षांच्या वयात १ कोटी ७६ लाख ४९ हजार ५६९ रुपयांचा घसघशीत परतावा मिळेल. हा अंदाज ५ हजार रुपये दरमहा गुंतवणुकीवर १२ टक्के व्याजाच्या हिशेबाने बांधण्यात आले आहे. जर त्यावर १५ टक्के व्याज मिळाले तर पुन्हा एकूण रिटर्न ३ कोटी ५० लाख ४९ हजार १०३ रुपये एवढा होईल. तर व्याज १० टक्के जरी मिळाले तरी ५ हजारांच्या गुंतवणुकीवर ३० वर्षांनंतर एकूण १ कोटी १३ लाख ९६ हजार ६२७ रुपयांचा रिटर्न मिळेल.
8 / 9
मात्र काही म्युच्युअल फंडांनी अपेक्षेप्रमाणे रिटर्न दिलेले नाहीत. लहान गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड करणे सर्वात कठीण काम असते. कारण योग्य फंडाची निवड करण्यासाठी खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे. तसेच याबाबत कुठल्यातरी माहितगाराकडून सल्लाही अवश्य घ्या. कारण म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही बाजार गुंतवणुकीमधील जोखमीवर आधारित असते.
9 / 9
म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांकडून पैचे गोळा करतात. त्यानंतर त्यामधील मोठी रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवली जाते. त्याबदल्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून चार्ज घेतात. ज्या लोकांना शेअर बाजारामधील गुंतवणुकीबाबत फार माहिती नसते अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य असते.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाbusinessव्यवसाय