शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI Earning opportunity: SBI सोबत सुरू करा 'हा' खास बिझनेस; महिन्याला होईल 90,000 रुपयांपर्यंतची कमाई, जाणून घ्या कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 6:23 PM

1 / 8
जर आपली घरबसल्या बिझनेस सुरू करायची इच्छा असेल आणि आपण अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधत असाल, तर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एका खास बिझनेसची माहिती. या व्यवसायातून आपल्याला दरमहा 90,000 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही संधी देत ​​आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रँचायझी घेऊन आपण जबरदस्त कमाई करू शखता. (Start SBI ATM franchise with low investment and earn 90k per month check how)
2 / 8
अशी मिळवता येईल फ्रेंचायझी - आपल्याला एसबीआय एटीएम फ्रँचायझी घ्यायची असेल, तर जवळच्या बँकेतून कोणत्या भागात एटीएमची आवश्यकता आहे, यासंदर्भात माहिती मिळवा. प्रस्तावित एटीएमसाठी केवळ 50 ते 80 फूट जागा असणे आवश्यक आहे.
3 / 8
केवळ दोन लाख रुपयांची सिक्योरिटी जमा करून ही फ्रेंचायझी खरेदी केली जाऊ शकते. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या स्वरुपात जमा करावे लागतील. अशा प्रकारे एकूण 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. महत्वाचे म्हणजे, हे डिपॉझिट रिफंडेबल असते. ते फ्रेंचायझी संपल्यानंतर परत मिळते.
4 / 8
एटीएम फ्रेंचायझीसाठी येथे करा अर्ज - काही कंपन्या एसबीआय एटीएमची फ्रँचायझी देतात. आपण त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एटीएम बसविणाऱ्या कंपन्या वेगळ्या असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
5 / 8
टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम बसविण्याचे काँट्रॅक्ट आहे. यासाठी आपण या कंपन्यांच्या वेबसाइट्सवर ऑनलाइन लॉगिन करून एटीएमसाठी अर्ज करू शकता.
6 / 8
ही कागदपत्रं आवश्यक - आयडी प्रूफ - (Aadhaar Card , Pan Card , Voter Card). अॅड्रेस प्रूफ - (रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल). बँक अकाउंट आणि पासबूक. फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर, GST नंबर, फायनांशिअल डॉक्युमेंट्स.
7 / 8
जाणून घ्या, किती होऊ शकते कमाई? - उत्पन्नाचा विचार केल्यास प्रत्येक कॅश ट्रांझेक्शनवर आपल्याला 8 रुपये, तर नॉन कॅश ट्रांझेक्शनवर 2 रुपये मिळतील. वर्षाचे रिटर्न ऑन इंव्हेस्टमेन्ट 33-50 टक्क्यांपर्यंत आहे.
8 / 8
उदाहरणार्थ आपल्या एटीएमच्या माध्यमाने रोज 250 ट्रांझेक्शन झाले आणि यात 65 टक्के कॅश ट्रांझेक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांझेक्शन असतील, तर आपल्याला महिन्याला जवळपास 45 हजार रुपये मिळतील. तसेच रोज 500 ट्रांझेक्शन झाले, तर आपल्याला 88 ते 90 हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळू शकेल.
टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाatmएटीएमbusinessव्यवसायbankबँक