शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाळेत जायच्या वयात सुरू केला व्यवसाय, १७ व्या वर्षी आहे ₹१०० कोटींच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 8:23 AM

1 / 8
आजवर आपण अनेकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील. अनेकांनी मोठ्या मेहनतीच्या जोरावर आपले व्यवसाय मोठे केले. वयाच्या १३ व्या वर्षी मुलं शाळेत जातात, पण एक मुलगा असा आहे ज्यानं या लहान आणि शाळेत जाण्याच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात आपल्या मेहनतीनं १०० कोटींची कंपनी उभी केली आहे.
2 / 8
यावर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण जाईल, पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे मुंबईच्या तिलक मेहता याची. त्यानं अगदी लहान वयातच एवढा मोठा आदर्श घालून दिला आहे, जो लाखो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.
3 / 8
तिलक मेहतानं अभ्यासासोबतच व्यवसाय सुरू ठेवला आणि २ वर्षात तो यशस्वी उद्योजकही बनला. शाळेत जाण्याच्या तरुण वयात तिलक २०० हून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. चला जाणून घेऊया त्याची यशाची कहाणी.
4 / 8
२००६ साली गुजरातमध्ये तिलकचा जन्म झाला. त्यानं वयाच्या १३ व्या वर्षीच आपल्या या कंपनीची सुरुवात केली. त्याच्यासोबत घटलेल्या एका घटनेनं त्याला या बिझनेसची आयडिया दिली. तो त्याच्या वडिलांना ऑफिसमधून आल्यानंतर काही सामान आणायला सांगायचा. तेव्हा थकल्यामुळे ते त्याला नकार द्यायचे. अशातच त्याला पुस्तकांची होम डिलिव्हरी करण्याची कल्पना सुचली.
5 / 8
यानंतर त्याने हा बिझनेस प्लॅन वडिलांसोबत शेअर केला. वडिलांनी तिलकला सुरुवातीचा या कामासाठी पैसे दिले आणि बँक अधिकारी घनश्याम पारेख यांच्यासोबत त्याची भेट करून दिली. दोघांनी मिळून पेपर एन पार्सल नावाची कुरिअर सेवा सुरू केली आणि घनश्याम पारेख कंपनीचे सीईओ बनले.
6 / 8
पेपर्स एन पार्सल हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे शिपिंग आणि लॉजिस्टिकशी संबंधित सेवा प्रदान करते. यासाठी कंपनीकडे मोठी टीम आहे. ही कंपनी आपल्या मोबाईल अॅपद्वारे लोकांना घरोघरी सेवा पुरवते.
7 / 8
त्यांच्या कंपनीशी २०० कर्मचारी आणि ३०० हून अधिक डब्बेवाले जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कंपनी दररोज हजारो पार्सल वितरित करते आणि त्यासाठी ४० ते १८० रुपये आकारते.
8 / 8
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, तिलक मेहता यांच्या कंपनीला इतके मोठे यश मिळालं की तिची उलाढाल १०० कोटी रुपयांवर पोहोचली. २०२१ मध्ये तिलक मेहता याची एकूण संपत्ती ६५ कोटी रुपये होती, तर मासिक वेतन २ कोटी रुपये होते.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी