शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० हजारांत सुरू केला बिझनेस, अनेक ठिकाणी आजमावलं नशीब; ४१५० कोटींची कंपनी, आता पद्म श्रीनं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 8:46 AM

1 / 6
मोठं यश मिळवायचं असेल तर संघर्षही तितकाच जास्त असतो. हे शशी सोनी यांना १०० टक्के लागू होतं. आज त्या ४ हजार कोटींहून अधिक किमतीच्या एका मोठ्या कंपनीची मालकीण आहेत. केवळ १० हजार रुपयांच्या सुरुवातीच्या भांडवलानं त्यांनी हे साम्राज्य उभं केलं असं म्हटलं तर तुम्हाला नक्कीच शॉक बसेल. त्यांच्या याच संघर्षाची कहाणी आपण जाणून घेऊ.
2 / 6
२०२४ साठीच्या पद्म पुरस्कारानं शशी सोनी यांचा जाहीर करण्यात आला. शशी सोनी यांनी १९७१ मध्ये पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला. १० हजार रुपयांचं भांडवल गुंतवून त्यांनी दीप ट्रान्सपोर्ट सुरू केलं आणि ते १९७५ पर्यंत चालवलं. पुढे दीप मंदिर सिनेमा या नावाने मुंबईतील मुलुंड परिसरात १९७५ साली पहिला एसी सिनेमा सुरू झाला. हा सिनेमाही १९८० पर्यंत चालला.
3 / 6
सुरूवातीचं दशक संघर्ष करावं लागल्यानंतर शशी सोनी यांनी यशाची पायरी चढण्यास सुरुवात केली. त्यांनी ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. म्हैसूरमध्ये उघडलेल्या या गॅस निर्मिती प्रकल्पातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले आणि संघर्षाचं रूपांतर यशात झालं. हळूहळू व्यवसाय वाढल्यानं त्यांनी तांत्रिक क्षेत्रातही प्रवेश केला.
4 / 6
शशी सोनी यांनी २००५ मध्ये IZMO LTD नावाची कंपनी स्थापन केली, जी मार्केट सोल्यूशन्स पुरवते. त्यांची कंपनी आज अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये हाय-टेक ऑटोमोटिव्ह आणि ई-रिटेलिंग सोल्यूशन्स प्रदान करते. शशी सोनी या कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्यांची कंपनी बीएसई आणि एनएसईवर देखील लिस्टेड आहे.
5 / 6
शशी सोनी अनेक सामाजिक कामांशीही जोडलेल्या आहेत. त्या दीप जनसेवा समितीच्या सदस्याही आहेत. नोकऱ्या देण्यासोबतच ही समिती महिलांना शिक्षित करणं, पेन्शन योजना सुरू करणं आणि दिव्यांगांसाठी निधी उभारण्याचं काम करते. IZMO LTD च्या अनेक उपकंपन्या देखील आहेत. यामध्ये Homestar Systems, Inc., izmocars Europe BVBA सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
6 / 6
पद्मश्री पुरस्कार मिळण्यापूर्वी शशी यांना व्यवसाय आणि समाजकल्याण क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले होते. १९९० मध्ये, त्यांना भारतीय उद्योगातील योगदानाबद्दल महिला गौरव पुरस्कार मिळाला. त्या ऑल इंडियन इंडस्ट्रियल गॅस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या होत्या. याशिवाय त्या तांत्रिक विकास संचालनालयाच्या सदस्याही होत्या.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी