Starting from 2 thousand earned 100 crores at 24 years share market investor Sankarsh Chanda
Stock Market Success Story : २ हजारांपासून सुरूवात, २४ व्या वर्षी १०० कोटींचा मालक; म्हणतात शेअर बाजाराचा बादशाह By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 6:30 PM1 / 7राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कचेलिया आणि डॉली खन्ना या दिग्गजांशिवाय भारतीय शेअर बाजाराची चर्चाच करता येणार नाही. या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले जेव्हा लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून लांब जात होते. 2 / 7आजचा काळ बदलला आहे. आता अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूकीला प्राधान्यही देताना दिसतायत. आता शाळा-महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थीही शेअर मार्केटमध्ये बिनदिक्कतपणे गुंतवणूक करत आहेत. 3 / 7आज आम्ही तुम्हाला अशा तरुण गुंतवणूकदाराची ओळख करून देणार आहोत ज्यानं शेअर बाजारातून १०० कोटी रुपये कमावले आहेत. आम्ही सांगच आहोत २४ वर्षीय गुंतवणूकदार संकर्ष चंदा याच्याबद्दल. शेअर बाजाराने हैदराबादच्या संकर्ष चंदा याचं नशीब ७ वर्षांतच बदलून टाकलं आहे.4 / 7आपलं कॉलेजचं शिक्षण घेत असताना संकर्ष चंदानं शेअर बाजाराच्या दिशेनं मोर्चा वळवला. २ हजार रुपयांपासून त्यानं आपल्या प्रवासाला सुरुवात केली. 5 / 7डीएनएच्या रिपोर्टनुसार, संकर्ष त्यावेळी नोएडा येथील एका विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक करत होता. संकर्षच्या म्हणण्यानुसार, त्यानं नंतर शेअर मार्केटमध्ये दीड लाख रुपये गुंतवले होते. ज्याचं दोन वर्षांनी मूल्य १२ लाख झालं.6 / 7संकर्ष चंदानं आपला अभ्यास अपूर्ण सोडला आणि पूर्ण लक्ष शेअर बाजारावर केंद्रित केलं. त्यानं Svobodha Infinity Investment Advisors Private Limited या कंपनीची सुरुवात केली. यासाठी त्यानं ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. 7 / 7कंपनी लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देते. Svobhadha Infinity Investment Advisors Private Limited ने पहिल्या वर्षी १२ लाख रुपये, दुसर्या वर्षी १४ लाख रुपये, तिसर्या वर्षी ३२ लाख रुपये आणि आर्थिक वर्ष२ २०२०-२१ मध्ये ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications