State Bank Of India Cuts Home Loan Interest Rates To 6 70 percent
State Bank कडून ग्राहकांना दिलासा; Home Loan च्या व्याजदरात पुन्हा कपात By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 12:11 PM1 / 13स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देताना गृहकर्जाचे व्याज दर कमी केले आहेत. 2 / 13बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं ३० लाख रूपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याज दरात कपात करत ते ६.९० टक्क्यांवरून ६.७० टक्के केले आहेत. 3 / 13तर ३० लाख ते ७५ लाख रूपयांच्या गृहकर्जावरील व्याजदर ६.९० टक्के राहतील. 4 / 13तर ७५ लाखांच्यावरील गृहकर्जावर ७.०५ टक्के व्याज आकारलं जाईल. 5 / 13याशिवाय बँकेनं महिलांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. महिलांना व्याजदरात ०.०५ टक्क्यांचा अतिरिक्त लाभ दिला जाईल. 6 / 13स्टेट बँक कॅल्क्युलेटरनुसार १५ वर्षांसाठी घेण्यात आलेल्या ३० लाखांच्या गृहकर्जासाठी ६.९५ टक्के व्याजदर आकारला जात होता. 7 / 13त्यानुसार ग्राहकाला २६,८८१ रूपयांचा ईएमआय भरावा लागत होता. परंतु आता व्याजदरात करण्यात आलेल्या कपातीनंतर ग्राहकांना मोठा फायदा मिळेल. 8 / 13जर आता ग्राहकांना १५ वर्षांसाठी ३० लाख रूपयांचं गृहकर्ज घेतलं तर त्याचा ईएमआय २५,६४६ रूपये इतका येईल. 9 / 13नव्या घोषणेनंतर स्टेट बँकेचे व्याजदर ६.९० टक्क्यांवर ६.७० टक्के इतके झाले आहेत.10 / 13स्टेट बँक कॅल्क्युलेटरनुसार जर कोणत्याही व्यक्तीनं १५ वर्षांसाठी ३० लाखांचं कर्ज घेतलं असेल तर महिन्याला त्यांचं ४१७ रूपये वाचतील. 11 / 13यानुसार ग्राहकांची १५ वर्षांसाठी जवळपास ७५,०६० रूपयांची बचतही होणार आहे.12 / 13तर महिलांसाठीही स्टेट बँकेनं विशेष योजना आणली आहे. यानुसार महिलांना गृहकर्जाच्या व्याज दरावर ०.०५ टक्क्यांची सूट देण्यात येते. 13 / 13महिला ग्राहकांना १५ वर्षांकरीता ३० लाखांसाठी २६,३८१ रूपयांचा ईएमआय द्यावा लागेल. यानुसार महिला ग्राहकांना १५ वर्षांसाठी ९० हजार रूपयांची बचत करता येऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications