Still not filed ITR? You can file the return after paying the penalty
आयटीआर फाइल अजूनही केली नाही? दंड भरुन रिटर्न फाइल करु शकता By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 7:20 PM1 / 10आयकर विभागाने ३१ जुलै २०२४ ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख शेवटच्या मुदतीची दिली होती.या वर्षी अनेकांनी वेळेत फाइल रिटर्न केली आहे. बऱ्याच करदात्यांनी अंतिम मुदतीच्या आत रिटर्न (ITR फाइलिंग) भरले असले आणि लवकरच त्यांना कर परतावा देखील मिळेल. पण, अजूनही अनेक करदात्यांनी आयटीआर भरलेला नाही.2 / 10मुदत संपल्यामुळे अनेकांना आता पुन्हा फाइल रिटर्न करता येईल का? असा प्रश्न पडला आहे. अजूनही कर दात्यांना फाइल रिटर्न करता येते पण आता तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.3 / 10करदाते दंड भरून रिटर्न भरू शकतात. रिटर्न उशिरा भरल्यास दंडासोबत व्याजही आकारले जाते. जर ३१ जुलै २०२४ पर्यंत रिटर्न भरले नसेल तर तुम्ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिटर्न भरू शकता.4 / 10कमी कर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत, करदात्याला दंड भरावा लागतो. ज्या करदात्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना १००० रुपये दंड भरावा लागेल. 5 / 10तर वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या करदात्याला ५,००० रुपये दंड भरावा लागतो. याशिवाय आयकर कायद्याच्या कलम 234A अंतर्गत करदात्याला करावर व्याजही द्यावे लागते.6 / 10जर तुम्ही रिटर्न भरले असेल पण त्यात चूक झाली असेल तर तुम्हाला सुधारित रिटर्न भरण्याची परवानगी आहे.7 / 10रेग्युलर रिटर्न भरण्याप्रमाणेच तुम्हाला लेट रिटर्न भरावे लागतात. त्यासारखीच ही प्रोसेस आहे, हे देखील दाखल करण्यासाठी, तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल.8 / 10तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल आणि आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित ITR फॉर्म निवडावा लागेल.9 / 10यानंतर, तुम्हाला मूल्यांकन वर्ष निवडावे लागेल आणि उत्पन्न तपशील, कपात आणि कर प्रविष्टी यासारखी माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला क्रॉसचेक करून सबमिट करावे लागेल.10 / 10आयटीआर भरल्यानंतर तुम्ही त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे रिटर्न अवैध मानले जाईल. करदाते आधार ओटीपी, नेटबँकिंगद्वारे रिटर्न ऑनलाइन पडताळू शकतात. याशिवाय करदात्याला ऑफलाइन रिटर्न व्हेरिफिकेशनची सुविधाही मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications