शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे शेअर्स नाहीत, 15 दिवसांत पैसा डबल करणारे मशीन; दिला छप्परफाड परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 6:45 PM

1 / 9
शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असतानाच, काही शेअर्स असे आहेत, ज्यांनी केवळ 15 दिवसांतच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कालावधीत सोलेक्स एनर्जीने 107 टक्क्यांहून अधिकच परतावा दिला आहे, तर रीजन्सी सिरॅमिक्सने 103, सालासर एक्सटीरियर्सने 102 आणि A&M जंबो बॅग्सने 100 टक्क्यांचा परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना खूश केले आहे. जाणून घेऊयात, या चारही शेअर्सची प्राइस हिस्ट्री...
2 / 9
सोलेक्सने एकावर्षात एक लाखाचे केले 9 लाखहून अधिक - सोलेक्स एनर्जी (Solex Energy) या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात छप्परफाड परतावा दिला आहे. या कालावधी, या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांच्या एक लाख रुपयांचे 9 लाख रुपये केले आहेत.
3 / 9
या शेअरने केवळ एका वर्षात 819 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 42.50 रुपये तर उच्चांकी किंमत 420.30 रुपये एवढी आहे. गेल्या एका महिन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास या शेअरने 150 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
4 / 9
1.85 रुपयांच्या शेअने दिला 1326 टक्के परतावा - रिजन्सी सिरॅमिक्स (Regency Ceramics) या बिल्डिंग मटेरियल बनवणाऱ्या कंपनीनेही केवळ एका वर्षातच आपल्या गुंतवणूक दारांच्या एक लाख रुपयांचे 14 लाखांहून अधिक केले आहेत. या काळात कंपनीने तब्बल 1326 टक्के एवढा परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात 183 टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 27.10 रुपये तर निच्चांकी किंमत 1.85 रुपये एवढी आहे.
5 / 9
Salasar ने एक लाखाचे केले 16.51 लाख - Salasar Exteriors and Contour च्या शेअर्सनीही आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्यात 115 टक्क्यांचा आणि एका आठवड्यात 146 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. एका वर्षाचा विचार करता या कंपनीने एका वर्षात 1551 टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त परतावा दिला आहे.
6 / 9
एक वर्षांपूर्वी Salasar Exteriors and Contour च्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्यांच्या एक लाख रुपयाचे आता 16.51 लाख रुपये झाले असतील. या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 263.85 आणि निच्चांकी किंमत 20 रुपये एवढी आहे.
7 / 9
A and M Jumbo Bags चा शेअरदेखील गेल्या काही दिवसांत जबरदस्त परतावा दित आहे. खरे तर, वरील तीन शेअर्सनी एका वर्षात केलेल्या कमाली सारखी A&M ची कामगिरी नसली तरी, या शेअरनेही 63 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
8 / 9
A and M Jumbo Bags च्या शेअरने एका महिन्यात चांगलीच उसळी घेतली आहे. या शेअरने या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 136 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 13.30 रुपये तर निच्चांक 5.05 रुपये एवढा आहे.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा