शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:56 PM

1 / 9
देशांतर्गत शेअर बाजारात हाहाकार दिसत आहे, सेंसेक्स 1200 अंकांनी घसरला आहे. मात्र, असे असतानाच दुसरीकडे अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे.
2 / 9
रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचा शेअर सोमवारी 7 टक्क्यांहून अधिक वधारत 345.40 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या साडेचार वर्षांत कंपनीचा शेअर 3600% पेक्षाही अधिकने वधारला आहे. दरम्यान हा शेअरने 9 रुपयांवरून 340 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
3 / 9
महत्वाचे म्हणज हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातली 350.90 रुपये एवढी आहे.
4 / 9
3600% हून अधिकची उसळी - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत 3600% पेक्षाही अधिक वधारला आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 9.20 रुपयांवर होता. 30 सप्टेंबर 2024 रोजी तो 345.40 रुपयांवर पोहोचला.
5 / 9
गेल्या 4 वर्षांचा विचार करता, कंपनीचा शेअर 1400% हून अधिकने वधारला आहे. तर गेल्या 2 वर्षांचा विचार करता रिलायन्स इन्फ्राचा शेअर 150% हून अधिकने वधारला आहे.
6 / 9
4 महिन्यांत पैसा डबल - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने केवळ 4 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. 31 मे 2024 रोजी रिलायन्स इन्फ्राचा शेअर 166.45 रुपयांवर होता. तो 30 सप्टेंबर 2024 रोजी 345.40 रुपयांवर पोहोचला.
7 / 9
गेल्या एका महिन्याचा विचा करता, कंपनीचा शेअर 65 टक्क्यांहून अधिकने वाधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 350.90 रुपये आहे. तर नीचांकी पातली 143.70 रुपये आहे.
8 / 9
निधी उभारण्यासाठी 1 ऑक्टोबरला बोर्डाची बैठक - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाची 1 ऑक्टोबरला बैठक होत आहे, या बैठकीत निधी उभारण्यासंदर्भात विचार केला जाणार आहे. कंपनी प्रेफरेन्शिअल इश्यू, क्वॉलीफाइड इंस्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू अथवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्सच्या माध्यमाने निधी उभारू शकते.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक