शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर असावा तर असा...! 75 रुपयांच्या स्टॉकनं केवळ 11 महिन्यांत दिला 3800% चा परतावा, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 7:22 PM

1 / 7
शेअर बाजारात बोंडाडा इंजिनीअरिंगच्या शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर केवळ 11 महिन्यांतच 3800% पेक्षाही अधिक वधारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर शुक्रवारी 2966.50 रुपयांवर बंद झाला.
2 / 7
IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत केवळ 75 रुपये एवढी होती. बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3049.70 रुपये तर नीचांक 142.50 रुपये एवढा आहे.
3 / 7
75 रुपयांना आला होता IPO - आईपीओमध्ये बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरची किंमत केवळ 75 रुपये एवढी होती. हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 18 ऑगस्ट 2023 रोजी खुला झाला होता आणि 22 ऑगस्टपर्यंत खुला होता. हा शेअर 30 ऑगस्ट 2023 रोजी 142.50 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला.
4 / 7
लिस्टिंगनंतर या शेअरमध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळाली. हा शेअर 26 जुलै 2024 रोजी 2966.50 रुपयांवर पोहोचला आहे. 75 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीचा शेअर 3800 टक्क्यांपेक्षाही अधिक वधारला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 6408 कोटी रुपये एवढे आहे.
5 / 7
या वर्षात आतापर्यंत 611% तेजी - बोंडाडा इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये या वर्षात आतापर्यंत 611 टक्के तेजी आली आली आहे. कंपनीचा शेअर यावर्षाच्या सुरुवातीला अर्थात 1 जानेवारी 2024 रोजी 417.10 रुपयांवर होता. बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर 26 जुलै 2024 रोजी 2966.50 रुपयांवर बंद झाला आहे.
6 / 7
तसेच, लिस्टिंगच्या दिवसानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 1883 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर या कालावधीत 149.62 रुपयांवरून 2966.50 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता हा शेअरमध्ये 343 टक्क्यांनी वधारला आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा