Stock market GRM Overseas stock 1 lakh rupee investment turned more than 59 crore
छोट्या शेअरची मोठी कमाल! फक्त 10 पैशांवर होते या कंपनीचे शेअर्स; आता लोक झाले करोडपती By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 10:18 PM1 / 8एका अत्यंत स्वस्त शेअरने (पेनी स्टॉक) गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत मालामाल केले आहे. हा शेअर जीआरएम ओव्हरसीजचा (GRM Overseas) आहे. 1 ऑक्टोबर 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स केवळ 10 पैशांवर होते आणि आता ते 598 रुपयांवर पोहोचले आहेत. अर्थात, कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 598000 टक्क्यांचा तगडा परतावा दिला आहे.2 / 8लक्षणीय गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 10000 रुपये लावले त्यांना कोट्यवधी रुपयांत परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी केवळ 10 हजार रुपयांचे 5.98 कोटी रुपये करण्याची कमाल केली आहे.3 / 81 लाख रुपयांचे झाले असते 59.80 कोटी रुपये - राइस मिलिंग कंपनी GRM ओव्हरसीजचे शेअर्स 1 ऑक्टोबर 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 10 पैशांवर होते. 7 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 598 रुपयांवर पोहोचले आहेत. 4 / 8यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 1 ऑक्टोबर 2004 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती तशीच ठेवली असती, तर आता तो पैसा 59.80 कोटी रुपये झाला असता.5 / 8याच पद्धतीने, जर एखाद्या व्यक्तीने 1 ऑक्टोबर 2004 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती तशीच ठेवली असती, तर आता ते 5.98 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले असते.6 / 8सहा वर्षांत 1 लाख रुपयांचे झाले 2 कोटी रुपये - जीआरएम ओव्हरसीजचे शेअर 11 मार्च 2016 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 3 रुपयांवर होते. 7 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE मध्ये 598 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 वर्षांत गुंतवणूकदारांना 19,900 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहे.7 / 8जर एखाद्या व्यक्तीने 11 मार्च 2016 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती तशीच ठेवली असती, तर आता त्या गुंतवणूकदाराचा पैसा 1.99 कोटी रुपये झाला असता. या कंपनीचे शेअर्स गेल्या 6 वर्षांत 200 टक्क्यांनी वाढले आहेत.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications