शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

JBM Auto Share : याला म्हणतात शेअर...! 200 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर मिळताच खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹60 वरून पोहोचला ₹2000 वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 4:40 PM

1 / 8
जेबीएम ऑटो लिमिटेडचे ​​शेअर्स बुधवारी फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर आज 6% पर्यंत वधारून ₹2011.85 च्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचला. एका मोठ्या ऑर्डरनंतर शेअरमध्ये ही तेजी दिसून आली आहे.
2 / 8
खरे तर, जेबीएम ऑटोची उपकंपनी असलेल्या जेबीएम इलेक्ट्रिक व्हेइकल्सने 200 इलेक्ट्रिक इंटरसिटी लक्झरी बसेसच्या पुरवठ्यासाठी लीफीबससोबत करार केला आहे.
3 / 8
अशी आहे डील - करारानुसार, जेबीएम इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशा 200 इलेक्ट्रिक इंटरसिटी बसेसचा पुरवठा करेल. या बसेस विविध मार्गांवर चालतील, यामुळे शहरांमधील संपर्क वाढेल आणि इंटरसिटी प्रवासाचे कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल.
4 / 8
जेबीएम ऑटोने एका फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, पुढील 24 महिन्यांत डिलिव्हरी पूर्ण होणे अपेक्षित आहे.
5 / 8
अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती - जेबीएम Auto Limited चा शेअर आज BSE वर ₹2011.85 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,417.30 रुपये तर नीचांक 1,113.70 रुपये एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 23,091.89 कोटी रुपये एवढे आहे.
6 / 8
जेबीएम ऑटो लिमिटेडच्या शेअर्सने या वर्षी आतापर्यंत 20% आणि एका वर्षात 25% एवढा परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 3200% वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 30 ऑगस्ट 2019 रोजी हा शेअर 60 रुपयांवर होता.
7 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा