शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 4:45 PM

1 / 7
शेअर बाजारातील स्मॉलकॅप कंपनी मफिन ग्रीन फायनान्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 11 टक्क्यांहून अधिकने वधरला आणि 120.30 रुपयांवर पोहोचला.
2 / 7
महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये केवळ 5 वर्षांतच 5500% पेक्षाही अधिकची वाढ झाली आहे. या काळात हा शेअर 2 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत पोहोचला. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 273.10 रुपये आहे. नीचांक 90.40 रुपये एवढा आहे.
3 / 7
5500% हून अधिकची तेजी - मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षात 5547% ची मोठी तेजी दिसून आली. 22 नोव्हेंबर 2019 रोजी या कंपनीचा शेअर 2.13 रुपयांवर होते. तो 18 नोव्हेंबर 2024 रोजी 120.30 रुपयांवर पोहोचले.
4 / 7
गेल्या 4 वर्षांत, मफिन ग्रीन फायनान्सचा शेअर 4450% ने वधारला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 2.65 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत वधारला. तसेच, गेल्या 2 वर्षांत कंपनीचा शेअर 233% ची वाढ झाली आहे.
5 / 7
सप्टेंबर तिमाहीत 5 कोटीहून अधिकचा नफा - मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 5.71 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 42.39% वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 4.01 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
6 / 7
नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचा महसूल सप्टेंबर 2024 च्या तिमाहीत 120% ने वाढून 46.20 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा महसूल 21 कोटी रुपये होता. कंपनीने आपल्या भागधारकांना जुलै 2023 मध्ये 2:1 या रेशो मध्ये बोनस शेअरही दिले आहेत.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक