शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानींचा हात लागताच ₹1 वरून ₹28 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 4:41 PM

1 / 8
गेल्या काही वर्षात मुकेश अंबानी यांची टेक्सटाइल कंपनी आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये, या शेअरची किंमत ₹ 1.4 होती, ती आता जवलपा ₹28 पर्यंत पोहोचली आहे.
2 / 8
या कालावधीत गुंतवणूकदारांना तब्बल 1900 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने मार्च 2020 मध्ये या स्टॉकमध्ये ₹10,000 ची गुंतवणूक केली असती तर आता तिचे ₹2 लाख झाले असते.
3 / 8
एका वर्षात 114 टक्क्यांचा परतावा रिटर्न - गेल्या 1 वर्षात या शेअरमध्ये 114 टक्क्यांची तेजी आली आहे. या वर्षात YTD मध्ये 31 टक्क्यांची तेजी आली आहे. मात्र, मार्च महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये 3.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 11 टक्क्यांची घसरण झाली होती.
4 / 8
मात्र, या वर्षात जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये 51.76 टक्क्यांची तेजी आली आहे. हा शेअर 9 जानेवारी, 2024 ला आपला 52-आठवड्यांचा उच्चांक म्हणजेच ₹39.05 पेक्षा 28 टक्क्यांनी खाली आहे. तसेच आपल्या 52-आठवड्यांचा निचांक ₹10.90 पेक्षा 156 टक्के वधारला आहे.
5 / 8
कंपनीचा कारभार - आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कापड उत्पादन करते आणि विकते. कंपनी परिधान कापड, नालीदार पॅलेट्स, कापूस आणि मिश्रित सूत, विणलेले कापड, घरगुती कापड, पॉलिस्टर धागे आणि भरतकाम उत्पादने, तसेच शॉपिंग बॅग आणि रुमाल यांचा उद्योग करते. कंपनीची स्थापना 1986 मध्ये झाली असून ही कंपनी मुंबईमध्ये आहे.
6 / 8
डिसेंबर तिमाहीचे परिणाम - डिसेंबर तिमाहीत (Q3FY24), कंपनीने ₹215.5 कोटीचा निव्वळ तोटा नोंदवला. गेल्या वर्षी याच तिमाहीत ₹241.43 कोटीचा तोटा झाला होता. दरम्यान, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 26 टक्क्यांनी घसरून ₹1,217 कोटीवर आला आहे.
7 / 8
महत्वाचे म्हणजे, 2020 मध्ये मुकेश अंबानी यांच्या RIL ने JM फायनान्शियल अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीसोबत अधिग्रहण केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे आलोक इंडस्ट्रीजमध्ये 1,98,65,33,333 शेअर अथवा 40.01 टक्का वाटा आहे. तसेच, जेएम फायनान्शियल अॅसेट रिकंस्ट्रक्शनकडे 34.99 टक्के हिस्सेदारी आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजारMukesh Ambaniमुकेश अंबानी