शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैसा ही पैसा... पैसा ही पैसा...! शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! ₹1 च्या शेअरनं एकाच वर्षात 1 लाखाचे केले ₹3 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 9:31 PM

1 / 7
आज आम्ही आपल्याला शेअर बाजारातील एका अशा शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच कोट्यधीश करण्याची किमया केली आहे. हा शेअर आहे श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडचा (Sri Adhikari Brothers Television Network Limited).
2 / 7
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने तेजी दिसत आहे. या शेअरला रोज 2% चे अप्पर सर्किट लागत आहे. आज मंगळवारीही हा शेअर 2% ने वधारून 353.04 रुपयांवर पोहोचला.
3 / 7
गुंतवणूकदार मालामाल - गेल्या वर्षी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या शेअरची किंमत केवळ 1.40 रुपये एवढी होती. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात 25117.14% चा परतावा दिला आहे. अर्थात एका वर्षात या शेअरने एक लाख रुपयांचे 3 कोटी रुपये केले आहेत.
4 / 7
गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, या शेअरने सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 715.33% चा परतावा दिला. या कालावधीत हा शेअर 43 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. या वर्षात हा शेअर 12,073.79% ने वधारला आहे. या कालावधीत हा शेअर 2.90 रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.
5 / 7
या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 353.04 रुपये तर नीचांक 41.25 रुपये एवढा आहे.
6 / 7
काय करते कंपनी - श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी आहे. हिचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. हिची स्थापना 1994 मध्ये झाली असून, ही एक मीडिया कंपनी विविध ब्रॉडकास्टर, अॅग्रीगेटर्स आणि सॅटेलाइट नेटवर्कसाठी प्रोडक्शन आणि कंटेंटच्या सिंडिकेशन क्षेत्रात कार्यरत आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketशेअर बाजार