शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 5:03 PM

1 / 10
शेअर बाजारातील नवरत्न कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचा शेअर गेल्या केवळ साडेचार वर्षांतच 4600 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या कालावधीत हा शेअर 13 रुपयांवरून 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
2 / 10
कंपनीने आपल्या फायनल डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. कंपनी प्रत्येक शअरवर 2.11 रुपयांचा फायनल डिविडेंड देत आहे आणि याची रेकॉर्ड डेट 23 सप्टेंबर 2024 आहे.
3 / 10
₹1 लाखाचे केले ₹47 लाख - रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरने गेल्या केवळ साडेचार वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 4653% एवढा परतावा दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रेल्वे कंपनीचा शेअर 12.80 रुपयांवर होते. तो 30 ऑगस्ट 2024 रोजी 608.45 रुपयांवर बंद झाला.
4 / 10
जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असेल, तर आती 1 लाख रुपयांचे मूल्य 47.53 लाख रुपये झाले असते.
5 / 10
रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये एवढा आहे. तर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक 129.90 रुपये आहे.
6 / 10
एका वर्षात 340% ची तेजी - रेल विकास निगम लिमिटेडचा (RVNL) शेअर गेल्या एका वर्षात 340 पर्सेंटने वधारला आहे. हा शेअर 1 सप्टेंबर 2023 रोजी 138.25 रुपयांवर होता. तो 30 ऑगस्ट 2024 रोजी 608.45 रुपयांवर पोहोचला आहे.
7 / 10
IPO मध्ये ₹19 वर होता कंपनीचा शअर - रेल विकास निगम लिमिटेडचा आयपीओ 29 मार्च 2019 रोजी खुला झाला होता आणि तो 3 एप्रिलपर्यंत ओपन होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 19 रुपये होती.
8 / 10
कंपनीचा आयपीओ एकूण 1.82 पट सब्सक्राइब झाला होता. तसेच, आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्सचा कोटा 2.92 पट सब्सक्राइब झाला होता.
9 / 10
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
10 / 10
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा