शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या पॉवर शेअरमध्ये तुफान तेजी, ₹31 वर पोहोचलाय भाव; कंपनीही कर्जमुक्त! LIC कडे तब्बल 10 कोटी शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 2:20 PM

1 / 8
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरचा शेअर गेल्या काही सेशन्सपासून सातत्याने फोकसवर आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीचा शेअर 5% पर्यंत वाढला आणि 31.25 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहोचला होता.
2 / 8
शेअरमध्ये ही तेजी गेल्या जून तिमाहीच्या निकालामुळे आली आहे. खरे तर, जून तिमाहीमध्ये रिलायन्स पॉवरचा घाटा कमी झाला असून महसूल वाढला आहे.
3 / 8
जून तिमाहीचे परिणाम - रिलायन्स पॉवरचा जून 2024 ला संपलेल्या तिमाहीत एकूण तोटा 97.85 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. कमाईत सुधारणा झाल्याने हा तोटा कमी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी गेले आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून या कालावधीत कंपनीला 296.31 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
4 / 8
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या महितीनुसार, या तिमाहीत त्याचे उत्पन्न 1,951.23 कोटी रुपयांवरून 2,069.18 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 2.01 टक्क्यांनी घसरून 29.77 रुपयांवर बंद झाले.
5 / 8
कंपनी कर्जमुक्त - रिलायन्स पॉवर ही 6,000 मेगावॅटची कार्यरत वीज निर्मिता कंपनी आहे. FY24 च्या मार्च तिमाहीत कंपनी स्टँडअलोन आधारावर कर्जमुक्त झाली आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात जवळपास 90% आणि गेल्या सहा महिन्यांत 17% हून अधिकची वृद्धी झाली आहे.
6 / 8
या शेअरने या वर्षात आतापर्यंत 30% परतावा दिला आहे. चार वर्षांत हा शेअर 3000% ने वधारला आहे. 2020 मध्ये या शेअरची किंमत केवळ 1 रुपया एवढी होती.
7 / 8
महत्वाचे म्हणजे, या कंपनीत एलआयसीचीही मोटी हिस्सेदारी आहे. एलआयसीकडे रिलायन्स पॉवरचे तब्बल 102758930 शेअर अर्थात 2.56% एवढा वाटा आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)