शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala Stock : राकेश झुनझुवाला यांच्या स्टॉकनं झाली छप्परफाड कमाई, गुंतवणूकदारांना 20 वर्षांत मिळाले 500000 टक्के रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 6:31 PM

1 / 7
शेअर बाजारात (Stock Market) एक म्हण आहे. या ठिकाणी पैसा स्टॉक खरेदी करण्यातून किंवा विकण्यातून बनत नाही, तर स्टॉक होल्ड करण्यातून बनतो. हे समजून घेण्यासाठी राकेश झुनझुनवाला यांच्या स्टायटन कंपनीचे शेअर्स उदाहरण म्हणून समजून घ्यावे लागतील.
2 / 7
गेल्या 20 वर्षांत, टायटनच्या शेअरची किंमत 4.03 रुपयांवरून (NSE वर 12 जून 2002 रोजी) वरून 2138 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच गेल्या दोन दशकात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 50000 टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 / 7
या स्टॉकसाठी 2022 हे वर्ष चांगले राहिले नाही. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत तब्बल 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे रुस-युक्रेन युद्ध असल्याचंही म्हटलं जातंय. त्याचवेळी, गेल्या एक वर्षाचा आढावा घेतला तर कंपनीच्या शेअरची किंमत 1738 रुपयांवरून 2138 रुपयांपर्यंत वाढली आहे.
4 / 7
म्हणजेच, या काळात टायटनच्या शेअरमध्ये 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे म्हणजे गेल्या 5 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर कंपनीच्या शेअरची किंमत 516 रुपयांवरून 2138 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत या शेअरनं तब्बल 315 टक्क्यांची झेप घेतल्याचं दिसून आलंय.
5 / 7
10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 221 रुपये होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल 870 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर आपण एक दशक मागे गेलो तर 20 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 4.03 रुपये होती, आज ती 2138 रुपये आहे. म्हणजेच गेल्या 20 वर्षात 50000 पटीने भाव वाढले आहेत.
6 / 7
5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्या 10 हजार रूपयांचं मूल्य आज आज 41,500 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, ज्याने 20 वर्षांपूर्वी टायटनच्या स्टॉकमध्ये 10 हजार रुपये गुंतवले, त्यांच्या या 10 हजारांचं मूल्य आज 53 लाख रुपये झाले आहे.
7 / 7
आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरच्या तिमाहित शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीनं या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3.98 टक्के आणि त्यांच्या पत्नीकडे 1.07 टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे मिळून 5.05 टक्के हिस्सा आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक