शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटाच्या या शेअरनं केली कमाल! एक लाख रुपयांचे झाले 39 लाख; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 1:21 PM

1 / 8
टाटा ग्रुपच्या एक कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यांत 33.05 रुपयांच्या लो लेव्हल वरून थेट 290.15 रुपयांच्या हाय लेव्हलपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आता हा शेअर 114.45 रुपयांना भेटत आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेलीसर्व्हिसेस लि. (TTML).
2 / 8
गेल्या 11 जानेवारी 2022 रोजी हा स्टॉक आपल्या हाय लेव्हलवर होता. तेव्हा ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर विकले, त्यांना या स्टॉकने मालामाल केले. मात्र, आता गेल्या तीन महिन्यांपासून हा शेअर गुंतवणूकदारांचे नुकसान करत आहे.
3 / 8
एक लाख रुपयांचे झाले 39 लाख - गेल्या तीन वर्षांपूर्वी टीटीएमएलमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे आता जवळपास 39 लाख रुपये झाले आहेत. गेल्या 3 वर्षांत या शेअरने तब्बल 3795 टक्के परतावा दिला आहे. मात्र गेल्या एक वर्षाचा विचार करता, या शेअरमधून मिळणारा परतावा 481 टक्क्यांनी घसरून 188.69 टक्क्यांवर आला आहे.
4 / 8
ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले त्यांचे 3.53 टक्क्यांचे नुकसान झाले आहे. महत्वाचे म्हणजे, 11 जानेवारीला टीटीएमएलचा सेअर आपल्या ऑल टाईम हाय 290.15 रुपयांवर बंद झाला होता. तर 24 ऑगस्ट 2021 ला हा शेअर 33.05 रुपयांवर आला होता.
5 / 8
टीटीएमएलचे काम काय? - टीटीएमएल ही एक टाटा टेलीसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लिडर आहे. ही कंपनी व्हॉईस, डेटा सर्व्हिस देते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीतही मोठ मोठी नावे आहेत.
6 / 8
मार्केटमधील तज्ज्ञाच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने स्मार्ट इंटरनेट बेस्ड सर्व्हिस कंपन्यांसाठी सुरू केली आहे. याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. कारण याच्या माध्यमाने कंपन्यांना फास्ट इंटरनेटसह क्लाउड बेस्ड सिक्योरिटी सर्व्हिस आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोल मिळत आहे.
7 / 8
क्लाउडवर आधारीत सिक्योरिटी, हे या सर्व्हिसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. यामुळे डेटा सुरक्षित राखण्यास मदत होते. जे बिझनेस डिजिटल पद्धतीने सुरू आहेत. त्यांना या लीज लाईनपासून मोठी मदत मिळते. यात प्रत्येक प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून सुरक्षा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच बरोबर फास्ट इंटरनेट सुविधाही दिली जात आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :TataटाटाInternetइंटरनेट