stock market share small cap midcap companies investors lost more money 2021 was profitable
लहान कंपन्यांमुळे गुंतवणूकदार ‘डब्यात’, २०२२ नं केलं कंगाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 9:27 AM1 / 9कमी भांडवल असलेल्या लहान कंपन्यांनी २०२२ मध्ये गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये या वर्षी आतापर्यंत १३ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. 2 / 9बाजाराच्या तुलनेत त्यांची कामगिरी अतिशय सुमार राहिली असून, आयटी कंपन्यांवरही मोठा दबाव आहे.अमुंबई शेअर बाजाराचा स्मॉलकॅप निर्देशांक यावर्षी आतापर्यंत ३,८१६.९५ अंक म्हणजे १२.९५ टक्के आणि मिडकॅप २,३१४.५१ अंक म्हणजे ९.२६ टक्क्यांनी कोसळला आहे. यांच्या तुलनेत ३० समभागांचा निर्देशांक ३,७७१.९८ अंक म्हणजे ६.४७ टक्केची घसरण झाली आहे.3 / 9अमेरिका, भारत, हाँगकाँग, सिंगापूरसह जगातील सर्वच शेअर बाजारांमध्ये यंदा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली आहे. जवळपास एका दशकापासून चालू असलेली तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये वाढ, नोकरीमध्ये झालेली वाढ, तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेली सतत वाढ याला २०२२ मध्ये ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय आयटी कंपन्यांचे समभाग यंदा सरासरी २७ टक्क्यांनी घसरले असून, अमेरिकेतील समभाग ४४ टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत.4 / 9काय आहेत कारणे? - वाढत्या महागाईची चिंता, भू राजकीय तणाव. विदेशी गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण. वाढते व्याजदर.5 / 9तज्ज्ञ काय म्हणतात? - चांगल्या काळात छोट्या कंपन्यांचे शेअर्स ‘लार्ज कॅप’पेक्षा जास्त वाढतात. बाजारात घसरण होत असताना लहान कंपन्यांमध्ये अधिक ‘करेक्शन’ सामान्य आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.6 / 9२० जून : बीएसई स्मॉलकॅप आपल्या ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तरावर पोहोचला होता. (२३,२६१.३९). १८ जानेवारी : रोजी स्मॉलकॅप वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. (३१,३०४.४४). २० जून : मिडकॅप ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तरावर होता. (२०,८१४)7 / 9१९ ॲाक्टोबर : मिडकॅप उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. (२७,२४६.३४). १७ जून : सेन्सेक्स ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तरावर घसरला होता. (५०,९२१.२२). १९ ॲाक्टोबर : २०२१ मध्ये सेन्सेक्स आपल्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. (६२,२४५.४३)8 / 9२०२१ : लहान कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी करत गुंतवणूकदारांना ६३ टक्केपर्यंत नफा दिला होता. २१.९९% : सेन्सेक्स २०२१ मध्ये फायद्यात राहिला होता.9 / 9मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक शेअर बाजारात वाढत असताना सेन्सेक्सच्या तुलनेत अधिक वाढले होते. त्यामुळे वाईट काळात ते पडणार हे स्वाभाविक आहे. गेल्या दोन वर्षांत मिडकॅप आणि स्मॉलकॅपने गुंतवणूकदारांना सर्वाधिक रिटर्न दिले आहेत, याकडे दुर्लक्ष व्हायला नको, असे बाजार तज्ज्ञ राहुल शाह म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications