शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Stock Market : PolicyBazaar च्या शेअर्सनं केलं कंगाल, ऑल टाईम हाय पेक्षा ७३ टक्क्यांनी घसरले; एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 9:23 AM

1 / 5
विविध कंपन्यांचा विमा उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या फिनटेक कंपनी पॉलिसी बाझारनं (PB Fintech Share Price) आपल्या गुंतवणूकदारांना कंगाल केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून कंपनीवर कोणतंही कर्ज नाही. तरीही या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या ऑल टाईम हायपेक्षा 73 टक्क्यांनी घसरले आहेत.
2 / 5
म्हणजेच ज्याने या शेअरमध्ये एक लाख रुपये ऑल टाईम हाय दराने गुंतवले असतील त्या एक लाखाचे मूल्य 27 हजारांवर आले आहे. पॉलिसी मार्केटचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1470 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 398.25 रुपये आहे. गुरुवारी तो 6.18 टक्क्यांनी घसरून 400.75 रुपयांवर बंद झाला.
3 / 5
पॉलिसी बाजार स्टॉकच्या किंमतीचा इतिहास पाहिल्यास, तो एका आठवड्यात 11.46 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात, पॉलिसी बाजारच्या शेअरच्या किमतीत 21.63 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
4 / 5
गेल्या 3 महिन्यांत शेअरची किंमत 23.56 टक्क्यांनी घसरली आहे. जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, तर त्याच्या गुंतवलेल्या रकमेत 48.62 टक्क्यांनी घट झाली असती.
5 / 5
पॉलिसी बाझारच्या शेअर्समध्ये एवढी घसरण झाली असली तरी बाजार विश्लेषक या शेअरवर बुलिश आहेत. 10 पैकी 6 तज्ज्ञ हे शेअर्स त्वरित खरेदी करण्याची शिफारस करतात. त्याच वेळी, दोन तज्ञांनी त्यात खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि दोघांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. (टीप - यात दिलेलं हे सल्लागारांचं मत आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक