Stock Market TATA and Adani groups Shares are giving Tremendous returns money doubled in a month
एका महिन्यात पैसे डबल! टाटा-अदानी ग्रुपचे 'हे' शेअर्स करतायत मालामाल; देतायत छप्परफाड रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 1:18 PM1 / 7गेल्या महिनाभरात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट करणाऱ्या मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्सपैकी तीन स्टॉक्स एकट्या अदानी समुहाचे आहेत. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवरने केवळ एका महिन्यातच आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. तर टाटा समूहाच्याही एका कंपनीने एका महिन्यात 83 टक्क्यांचा परतावा दिला आहे.2 / 7अदानी पॉवरचा शेअर मंगळवारी पाऊणे 11 वाजेपर्यंत एक महिन्यात 121.80 रुपयांवरून 231.50 रुपयांवर पोहोचला. या काळात या शेअरने तब्बल 90.23 टक्क्यांची उसळी घेतली. 3 / 7आश्चर्यचकित करणारी उसळी - अदानी समूहाचा दुसरा स्टॉक म्हणजे, अदानी विल्मर. आपल्या लिस्टिंग प्राइसच्या तुलनेत या स्टॉकची किंमत जवळपास अडीच पट वाढली आहे. या स्टॉकनेही एक महिन्यात तब्बल 74 टक्के रिटर्न दिले आहेत. सध्या 11 वाजे दरम्यान हा स्टॉक 599 रुपयांवर होता.4 / 7टाटा ग्रुपची कंपनी टीटीएमएलची कमाल - फक्त एकाच महिन्यात जबरदस्त नफा मिळवून देणाऱ्या स्टॉक्समध्ये दुसरे नाव आहे ते टाटा समूहाच्या TTML कंपनीचे. दूरसंचार क्षेत्रातील या कंपनीने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 83 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. आज टीटीएमएलच्या शेअरची किंमत 108.25 रुपयांवरून 198.75 रुपयांवर पोहोचली आहे.5 / 7गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्सच्या यादीत ब्राइटकॉम समूह (Brightcom Group) चौथ्या क्रमांकावर आहे. या कंपनीचा शेअर एकाच महिन्यात 58.35 रुपयांवरून 96.90 रुपयांपर्यंत वधारला आहे. परताव्याचा विचार करता या एका महिन्यात या शेअरने 66 टक्के एवढा परतावा दिला आहे.6 / 7चांगला नफा मिळवून देण्यात पुन्हा एकदा अदानी ग्रुपचेच नाव येते. अदानी टोटल गॅसनेही गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास दीड पट वाढवला आहे. मंगळवारी 11 वाजण्याच्या सुमारास हा स्टॉक जवळपास 2599.80 रुपयांवर होता, तर एक महिना आधी याच्या शेअरची किंमत 1661.85 रुपये एवढी होती.7 / 7टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications