शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेतून ऑर्डर मिळताच या ₹25 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या! देतोय बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 5:16 PM

1 / 8
शेअर बाजारात वीरहेल्थ केअर लिमिटेडचा ​​शेअर सात्याने फोकसमध्ये आहे. कंपनीच्या शेअरला गेल्या शुक्रवारी 5% चे अप्पर सर्किट लागले होते आणि हा शेअर 25 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता.
2 / 8
ओरल केअर प्रोडक्ट्स तयार करणारी अग्रगण्य कंपनी वीरहेल्थ केअर लिमिटेडने, अमेरिकेतील एका आघाडीच्या संस्थात्मक सप्लायरकडून जवळपास 33,35,000 रुपयांची अथवा 40,111 अमेरिकन डॉलरची अतिरिक्त निर्यात ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे.
3 / 8
कंपनीला आतापर्यंत एकूण 4.50 कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळाली आहे. त्यांपैकी अंदाजे 3 कोटी रुपयांच्या ऑर्डर्सची यशस्वी निर्मिती आणि पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित ऑर्डर 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाठवली जाणे अपेक्षित आहे.
4 / 8
कंपनी गुजरातमधील वापी येथील आपल्या सध्याच्या प्लांटचे नूतनीकरण करून मोठा प्लांट उभारत आहे. हा प्लांट US FDA द्वारे आवश्यक असलेल्या CGMP नियमांप्रमाणे असेल. हा प्लांट ऑक्टोबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
5 / 8
कंपनीने FY24 मध्ये 14.61 कोटी रुपयांचा एकूण रेव्हेन्यू आणि 1.28 कोटी रुपयांचा टॅक्स प्री प्रॉफिट नोंदवला आहे. कंपनीला पुढील दोन ते तीन वर्षांत 10 टक्के पीएटी सह 100 कोटी रुपयांच्या रेव्हेन्यूपर्यंत पोहोचण्याची आशा आहे.
6 / 8
कंपनीचा कारभार - वीरहेल्थकेअर लिमिटेड रिसर्च-बेस्ड आयुर्वेदिक औषधींची निर्मिती आणि मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय आहे. 3 वर्षांच्या 75 टक्के सीएजीआरसह कंपनीचे मार्केट कॅप 47.62 कोटी रुपये एवढे आहे.
7 / 8
हा शअर आपल्या 52-आठवड्यांच्या 13.60 रुपये या नीचांकी पातळीपासून 75 टक्के वर आहे. आणि गेल्या केवळ 3 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार