stock market wpil share climbed to 1700 rupee level from 3 rupee
मालामाल करणारा मल्टीबॅगर स्टॉक! 3 रुपयांवरून थेट 1700 वर पोहोचला, 1 लाखाचे केले 6.23 कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 6:39 PM1 / 6स्मॉलकॅप कंपनी डब्ल्यूपीआयएल लिमिटेड (WPIL Limited) च्या शेअरने गेल्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 3 रुपयांवरून थेट 1700 रुपयांच्याही वर पोहोचला आहे. मल्टीबॅगर कंपनीच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना तब्बल 60000 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे. 2 / 6कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चपातळी 1791.65 रुपये आहे. तसेच नीचांकी पातळी 802.40 रुपये एवढी आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सेशनमध्येही कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. तसेच हा स्टॉक जवळपास 53 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर 5 दिवसांत 1158 रुपयांनी वाढून 1745 रुपयांवर पोहोचला आहे.3 / 61 लाखाते धाले 6 कोटी - डब्ल्यूपीआयएल लिमिटेड (WPIL Limited) चा शेअर 28 फेब्रुवारी 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 2.80 रुपयांवर होता. तो 14 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसईवर 1745.05 रुपयांवर पोहोचला. या काळात कंपनीच्या शेअर्सनी 62400 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 28 फेब्रुवारी 2003 रोजी डब्ल्यूपीआयएलच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्याचे 6.23 कोटी रुपये झाले असतील.4 / 6459 टक्क्यांनी वाढलाय कंपनीचा तिमाही नफा - चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत डब्ल्यूपीआयएलचा करानंतरचा नफा 459 टक्यांनी वाढून 83.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जबरदस्त रेव्हेन्यूमुळे कंपनीच्या नफ्यात ही वृद्धी झाली आहे. 5 / 6चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू वार्षिक आधारावर 106 टक्क्यांनी वाढून 507.2 कोटी रुपये होता. तसेच, इबिट्डा मार्जिन 732 बेसिस प्वाइंटनेवाढून 20.9 टक्क्यांवर पोहोचले आहे. डब्ल्यूपीआयएल, देशात मुख्य पंप अँड पंपिंग सिस्टिम कंपनीच्या रुपात आपली पोझिशनमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे.6 / 6(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications