Story of Businessman Azim Premji who donated billions of rupees for India's welfare ajg
टाटांसारखीच आहे ख्याती, दान केलीय कोट्यवधींची संपत्ती; गोष्ट 'भारतीय बिल गेट्स'ची By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 8:26 PM1 / 11कोरोनाविरुद्धच्या भारताच्या लढाईसाठी 1500 कोटींची भरीव मदत करून टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या औदार्याचं दर्शन घडवलं आहे. देशावर संकट आल्यानंतर प्रत्येक वेळी टाटा समूह धावून आलाय आणि भारताच्या उभारणीत, जडणघडणीतही त्यांचं अमूल्य योगदान आहे.2 / 11देशाच्या भल्यासाठी सदैव तत्पर असलेल्या अनमोल रत्नांमधील रतन टाटांसारखंच आणखी एक नाव म्हणजे, विप्रो समूहाचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी. 3 / 11कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्यासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशन आणि विप्रो समूहाने १,१२५ कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे. अर्थातच, ही पहिली वेळ नाही. आत्तापर्यंत त्यांनी देशासाठी काय केलंय, हे पाहिल्यावर त्यांच्या मनाचा मोठेपणा नक्कीच लक्षात येईल.4 / 11अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकण्यासाठी गेलेल्या अझीम प्रेमजी यांना वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे शिक्षण सोडून परतावं लागलं आणि विप्रोची सूत्रं सांभाळावी लागली.5 / 11तेव्हा, Western Indian Vegetable Products Ltd, अर्थात विप्रो ही कंपनी सनफ्लॉवर ऑईल आणि कपडे धुण्याचा साबण एवढ्यापुरतीच मर्यादित होतं. मात्र, अझीम प्रेमजी यांनी उत्पादनं वाढवली. विजेचे दिवे, हायड्रोलिक सिलेंडर्स, बेबी केअर प्रॉडक्ट्स बाजारात आणली. 6 / 11येणारं युग हे माहिती-तंत्रज्ञानाचं असेल, हे ओळखून विप्रोनं कॉम्प्युटर हार्डवेअर बनवण्यास सुरुवात केली आणि बघता-बघता कंपनीच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्स येऊ लागले. २००० साली न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये विप्रोचं लिस्टिंग झालं.7 / 11त्यानंतर, बीपीओ आणि इको एनर्जीमध्येही विप्रोनं पाऊल टाकलं आणि जगातील वेगानं वाढणारी कंपनी म्हणून नावलौकिक मिळवला.8 / 11ऑक्टोबर २०१९ पर्यंत अझीम प्रेमजी यांची संपत्ती ७.२ अब्ज डॉलर इतकी होती. तरी, आजही ते इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात. यातून त्यांचा साधेपणा, डाउन टू अर्थ असणं सहज लक्षात येतं. 9 / 11गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, १३ लाख सरकारी शाळांना नवसंजीवनी देण्याच्या हेतूने अझीम प्रेमजी फाउंडेशन कार्यरत आहे. गेल्या वर्षी अझीम प्रेमजी यांनी आपले ३४ टक्के समभाग, म्हणजेच सुमारे ५० हजार कोटी रुपये दान केले होते. 10 / 11उद्योग आणि समाजसेवा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी अझीम प्रेमजी यांना पद्मविभूषण किताबानं सन्मानित करण्यात आलं आहे. 11 / 11अझीम प्रेमजी यांनी आयटी क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्यांचं दातृत्व पाहता ते 'भारताचे बिल गेट्स' म्हणूनही ओळखले जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications