Strong purchase of private sector icici bank The share became a rocket, the price can reach ₹1250
खासगी क्षेत्रातील बँकेची तगडी खरेदी! रॉकेट बनला शेअर, ₹1250 वर पोहोचू शकतो भाव! By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 5:07 PM1 / 8शेअर बाजारात खासगी क्षेत्रातील ICICI बँकेच्या शेअरला शुक्रवारी जबरदस्त मागणी होती. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची तेजी आली आहे आणि शेअरचा भाव 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यातच हा शेअर 1200 रुपयांच्याही वर जाऊ शकतो, असा अंदाज ब्रोकरेज व्यक्त करत आहेत. 2 / 8असं आहे तेजीचं कारण - ICICI बँकेने ओपन मार्केट ट्रांझॅक्शनच्या माध्यमाने ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारीला ICICI बँकेने ICICI लोम्बार्ड जनरल इंन्शुरन्समध्ये 431 कोटी रुपयांमध्ये अतिरिक्त 25.14 लाख शेअर खरेदी केले आहेत. 3 / 8याच्याच दोन दिवस आधीच ICICI बँकेने ICICI लोम्बार्डमध्ये 1,356 कोटी रुपयांमध्ये जवळपास 81 लाख शेअरचे अधिग्रहण करण्यासंदर्भात घोषणाही केली होती. या शेअर अधिग्रहणानंतर ICICI लोम्बार्ड आता बँकेची सहायक कंपनी बनली आहे.4 / 8शेअरमध्ये तुफान तेजी - यातच, शुक्रवारी ICICI बँकेचा शेअर 3 टक्क्यांहून अधिकने वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावरर म्हणजेच 1089.50 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये यावर्षात आतापर्यंत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. 5 / 8या कालावधीत बँक निफ्टी इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच ICICI लोम्बार्डचे शेअर 2 टक्क्यांनी घसरून 1,670 रुपयांवर आले आहेत.6 / 8अशी आहे टार्गेट प्राइस - अरिहंत कॅपिटल मार्केट्सचे विश्लेषक मायलिन वासुदेव यांनी ICICI बँकेच्या शेअरसाठी 1120-1180 रुपयां दरम्यान टार्गेट प्राइस दिले आहे. याशिवाय स्टॉकवर होल्ड करण्याचाही सल्ला दिला आहे. तसेच स्टॉप लॉस 1,030 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 7 / 8ब्रोकरेज डेवेन चोकसी रिसर्चने ICICI बँकेच्या शेअरवर त्याचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे. त्यांनी बँकिंग स्टॉकसाठी 1250 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. ब्रोकरेज कंपनी गोल्डमन सॅक्सने ICICI बँकेच्या शेअर्सचे रेटिंग बाय वरून न्यूट्रल केले आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications