शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुन्हा उभारी, विदेशी बाजारात Adani Group च्या बाँड्सच्या किंमतीत जबरदस्त रिकव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 4:15 PM

1 / 7
अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या बाँड्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे मुदतपूर्तीवर परत करणार असल्याचे समूहाने सांगितल्यानंतर या बाँड्सच्या किमती वाढल्या आहेत.
2 / 7
अमेरिकन फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या बाँड्सच्या किमती कोसळल्या होत्या. अदानी समूहाने विदेशी बाजारपेठेत १५ बाँड इश्यूद्वारे पैसा उभा केला आहे. हे बाँड्स डॉलरमध्ये जारी केले जातात.
3 / 7
आता, ब्लूमबर्ग डेटानुसार, १५ पैकी फक्त तीन इश्यूमध्ये ७० सेंट्सच्या खाली बाँडच्या किमती आहेत. ७० सेंटपेक्षा कमी बॉण्डची किंमत खूप वाईट मानली जाते. याकडे कंपनी अडचणीत येण्याचे लक्षण मानले जाते.
4 / 7
ब्लुमबर्गच्या डेटानुसार अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबईच्या २०३१ मध्ये मॅच्युअर होणाऱ्या बाँडची किंमत ०.७ सेंट्सनं वाढून ७२ सेंट्सवर पोहोचली. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही शुक्रवारीही रिकव्हरी दिसून आली. रोख्यांच्या किमतीतील रिकव्हरी सूचित करते की अदानी समूहाच्या आर्थिक स्थितीबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता कमी होत आहेत.
5 / 7
हिंडेनबर्ग अहवालानंतर, १५ पैकी दोन इश्यू सोडून उर्वरित बाँड इश्यूच्या किमती ७० सेंटच्या खाली आल्या होत्या. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाँडची किंमत ५८.९ सेंटपर्यंत खाली आली होती. दरम्यान आताही अनेक अदानी समूहाच्या बाँडचे यील्ड हाय लेव्हलवर आहे. यावरून हे सूचित करते की समूहाला नवीन भांडवल उभारण्यासाठी बाँड इंटरेस्ट रेट अधिक जास्त ठेवावा लागेल.
6 / 7
वेल्थमिल सिक्युरिटीजच्या संचालक क्रांती बाथिनी यांनी सांगितले की, अदानी समूह त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करतो हे पाहावे लागेल. समूहासाठी हे खूप सोपे असेल असे वाटत नाही. परंतु, खात्री आहे की ते त्यांचे कर्ज फेडण्यास सक्षम असतील. ते सध्या त्यांच्याकडे असलेल्या छोट्या कर्जाची परतफेड करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
7 / 7
अदानी समूहाने गुरुवारी सांगितले की पुढील वर्षी कर्ज आणि EBIDTA चे प्रमाण कमी करायचे आहे. आता हे प्रमाण ३.२ पट आहे. ते ३ च्या खाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यापूर्वी, समूहाने असेही म्हटले होते की कर्जाची परतफेड करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. लवकरच पैशांची गरज भासणार असल्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसाय