शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story : वय वर्ष ८३, सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक; ४१००० कोटींच्या संपत्तीचे मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 9:18 AM

1 / 6
चंद्रू रहेजा यांचं वय ८३ वर्ष असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील ते मोठं नाव आहे. ४१ हजार कोटी रुपयांचे मालक असलेल्या चंद्रू रहेजा यांचं भारतीय उद्योग जगतात मोठे स्थान आहे. चंद्रू रहेजा हे के रहेजा कॉर्पचे चेअरमन आहेत.
2 / 6
के रहेजा कॉर्प ही कंपनी त्यांचे वडील लछमनदास रहेजा यांनी १९५६ मध्ये सुरू केली होती. १९९६ मध्ये कौटुंबिक व्यवसायाचं विभाजन झाल्यानंतर चंद्रू रहेजा यांनी कंपनीची सूत्रं हाती घेतली. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी त्याला नव्या उंचीवर नेलं.
3 / 6
चंद्रू रहेजा यांच्या नेतृत्वाखालील के रहेजा कॉर्प रिअल इस्टेटमधील एक मोठं आणि विश्वासार्ह नाव बनलं आहे. ऑफिस स्पेस, हॉटेल्स, मॉल्स, होम, रिटेल आणि पॉवर अशा अनेक क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. या ग्रुपमध्ये काही प्रसिद्ध कंपन्या आहेत. यामध्ये शॉपर्स स्टॉप, इनऑर्बिट आणि माइंडस्पेसचा समावेश आहे.
4 / 6
शॉपर्स स्टॉप ही देशभरात पसरलेली एक मोठी डिपार्टमेंटल स्टोअर चेन आहे. इनऑर्बिट मॉल हे मुंबई, हैदराबाद आणि बडोदा येथील लक्झरी रिटेल डेस्टिनेशन आहे. तर माइंडस्पेस हे मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथे असलेले एक अत्याधुनिक आयटी पार्क आहे.
5 / 6
'के. रहेजा कॉर्प'चा आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शॅलेट हॉटेल्स. हे त्याच्या आलिशान हॉटेल्ससाठी ओळखले जाते. यामध्ये जेडब्ल्यू मॅरियट मुंबई, वेस्टिन हैदराबाद माइंडस्पेस, बंगळुरू मॅरियट हॉटेल व्हाईटफिल्ड आणि लोणावळ्यातील ड्यूक्स रिट्रीट सारख्या नामांकित हॉटेल्सचा समावेश आहे. २०१९ मध्ये शॅलेट हॉटेल्स शेअर बाजारात लिस्ट झाली आणि हॉटेल उद्योगात आपलं मजबूत स्थान त्यांनी निर्माण केलं.
6 / 6
२०२३ च्या पहिल्या तिमाहीत 'के रहेजा कॉर्प होम्स'नं ११०० कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला. 'के. रहेजा कॉर्प'ची ही कंपनी घरांची उभारणी करते. हे यश 'रहेजा मॉडर्न विवेरा'मुळे मिळालं आहे. दक्षिण मुंबईत दोन टॉवर्स असलेला हा आलिशान निवासी प्रकल्प आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी