शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 8:44 AM

1 / 8
Success Story: जर मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. तुम्ही आजवर अनेकांची यशोगाथा ऐकली असेल. पण एका गृहिणीनं आपला शिवणकामाचा छंद जोपासला आणि आज त्याला एका मोठ्या ब्रँडमध्ये रुपांतरीत केलं. आज त्यांचा ब्रँडचं मूल्य ८०० कोटींहून अधिकचा व्यवसाय करतो.
2 / 8
मीना बिंद्रा एकेकाळी गृहिणी होत्या. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी शिवणकामाचा छंद व्यवसायात बदलला. आज त्यांची कंपनी 'बिबा' ८०० कोटींहून अधिकचा व्यवसाय करते. मीना बिंद्रा यांनी घरबसल्या साधे सूट विकून बिबाची सुरुवात केली. आज, बिबा भारतातील टॉप एथनिक कपड्यांच्या ब्रँडपैकी एक आहे. मीना बिंद्रा यांनी केवळ बिझनेस जगतातच नाव कमावलं नाही, तर त्यांनी अनेक महिलांना व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली आहे. मीना बिंद्रा यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
3 / 8
मीना बिंद्रा यांचा जन्म दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर वयाच्या २० व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. मीना यांना संजय आणि सिद्धार्थ ही दोन मुलंही आहेत. वयाच्या ४० व्या वर्षी मुलं मोठी झाल्यावर त्यांनी घरबसल्या 'साधे कॉटन प्रिंटेड सूट' विकायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण नव्हतं.
4 / 8
मुंबईत राहत असताना मीना यांनी १९८३ मध्ये भावाच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये एक प्रदर्शन भरवलं. तिथे त्यांनी स्वत:चे शिवलेले सूट विकले. पहिल्या प्रदर्शनात त्यांना जबरदस्त यश मिळालं. लोकांनी त्यांनी तयार केलेल्या सूट्सना उत्तम प्रतिसाद दिला आणि मोठी विक्री झाली.
5 / 8
मीना बिंद्रा यांच्या पतीनं त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली. बँकेकडून ८००० रुपयांचे कर्ज मिळालं. मीना यांच्या व्यवसायाचं हे सुरुवातीचे भांडवल होतं. त्यांनी साधे सूट बनवले होते ज्यावर ब्लॉक छापले गेले होते. जेव्हा मीना यांचे बहुतेक सूट प्रदर्शनात विकले गेले आणि त्यांचे पैसे जवळजवळ दुप्पट झाले त्यावेळी मीना यांनी त्यांच्या गुंतवणुकीचा अर्धा भागही खर्च केला नव्हता. हळूहळू मीना यांना चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतही प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील मोठमोठ्या स्टोअर्समधून ऑर्डर येऊ लागल्या. यानंतर त्यांचे सूट्स चर्चेचा विषय बनले.
6 / 8
पंजाबीमध्ये 'बिबा' हा शब्द प्रामुख्यानं प्रेमळ नाव म्हणून वापरला जातो. हा सहसा मुलीला किंवा स्त्रीला संबोधतो. बिबा ब्रँडला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक तेव्हा मिळाला जेव्हा किशोर बियाणी यांनी 'ना तुम जानो ना हम' या चित्रपटात भागीदारीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर ब्रँडनं मागे वळून पाहिलं नाही. आज, बीआयबीएची ३०० पेक्षा जास्त ब्रँड आउटलेट्स आणि २७५ मल्टी-ब्रँड आउटलेट्स आहेत. त्यांचा एकूण महसूल ८०० कोटींहून अधिक आहे.
7 / 8
एथनिक अपॅरल इंडस्ट्रीतील योगदानाबद्दल २०१५ मध्ये क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं (सीएमएआय) सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं. २०१२ मध्ये बिबाला इमेजेस अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट एथनिक वेअर ब्रँड फॉर वुमन' हा किताब देण्यात आला होता.
8 / 8
बिबाचा प्रभाव केवळ फिजिकल स्टोअर्सपुरता मर्यादित नाही. ब्रँडनं आपल्या ई-कॉमर्स पोर्टल biba.in द्वारे डिजिटल युगाचा एन्ट्री केली. मीना बिंद्रा यांचा गृहिणी ते यशस्वी उद्योजक असा प्रवास असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. चिकाटी, जिद्द आणि जोखीम घेण्याची तयारी यांचं महत्त्व यातून दिसून येतं.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीbusinessव्यवसाय