शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 8:43 AM

1 / 8
Success Story : विनोद खोसला हे सिलिकॉन व्हॅलीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अपयशापासून यशापर्यंतच्या प्रवासासाठी ते प्रसिद्ध आहेत. पुण्यात जन्मलेल्या खोसला यांना सुरुवातीच्या काळात व्यवसायात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं.
2 / 8
त्यांचे पहिले दोन व्यवसाय यशस्वी झाले नाहीत. मग त्यांनी अमेरिकेची वाट धरली. तिथेच त्याचं नशीब बदललं. आज विनोद खोसला हे एक यशस्वी भारतीय-अमेरिकन व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत. त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले आहे. विनोद खोसला यांच्या यशोगाथा प्रवासाविषयी जाणून घेऊया.
3 / 8
विनोद खोसला यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही किंवा तंत्रज्ञानाशी संबंध नसतानाही खोसला यांनी नेहमीच उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी इंटेलच्या स्थापनेबद्दल आणि त्याच्या स्थलांतरित संस्थापकांचा प्रवास ऐकला. यातूनच त्यांना स्वत:चा व्यवसाय निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली.
4 / 8
खोसला यांनी यशस्वी उपक्रम स्थापन करण्याच्या दिशेनं आपला प्रदीर्घ आणि खडतर प्रवास सुरू केला. परंतु, हा रस्ता अडथळ्यांनी भरलेला होता. सोया मिल्क कंपनी हा त्यांचा पहिला उपक्रम होता. याचा उद्देश भारतातील ज्या लोकांकडे रेफ्रिजरेटर नाही त्यांच्या समस्या सोडविणं हा होता. ही एक उत्तम कल्पना होती, पण खोसला यांना ती जमीनीवर उतरवण्यात अपयश आलं. हा उपक्रम अपयशी ठरला.
5 / 8
खोसला मात्र निराश झाले नाहीत. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. त्यांनी कार्नेगी मेलन विद्यापीठातून बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांच्या उद्योजकतेच्या महत्त्वाकांक्षेमुळे नंतर ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेले, जिथे त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं.
6 / 8
खोसला यांचा दुसरा उपक्रम म्हणजे डेझी सिस्टीम्स. त्यात त्यांना काही प्रमाणात यश ही आलं. १९८२ मध्ये सन मायक्रोसिस्टमची सुरूवात झाली, कारण डेजी सॉफ्टवेअर चालवण्यासाठी कस्टम कम्प्युटर सिस्टमची गरज होती. खोसला यांनी आपले मित्र जॉन डोएर यांच्यासोबत मिळून क्लेनर पर्किन्स फॉफिल्ड अँड बायर्सची (KPCB) स्थापना केली.
7 / 8
खोसला १९८६ मध्ये केपीसीबीमध्ये जनरल पार्टनर म्हणून रुजू झाले आणि चिप बनवण्याच्या बाजारपेठेतील इंटेलच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी सेमीकंडक्टर फर्म नेक्स्टजेन उभारण्यास मदत केली. नेक्स्टजेननंतर सेमीकंडक्टर बाजारपेठेतील इंटेलची मुख्य स्पर्धक अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेसनं (एएमडी) विकत घेतली. जवळपास दोन दशकं अनेक पायाभूत उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर खोसला यांनी २००४ मध्ये खोसला व्हेंचर्सची स्थापना केली. ही व्हेंचर कॅपिटलिस्ट फर्म आहे. या इन्व्हेस्टमेंट फर्ममुळं त्यांची नेटवर्थ गगनाला भिडली. ते आता जवळपास ६४,३२५ कोटींचे (७.७ अब्ज डॉलर) मालक आहेत.
8 / 8
खोसला यांच्याकडे ५३ एकर जमीन असून त्यात भव्य हवेली आणि प्रायव्हेट बीच आहे. खोसला हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. भारतीय-अमेरिकन उद्योगपतीनं कार्नेगी मेलन विद्यापीठातून बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केलं आहे. खोसला हे ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सचे संचालक मंडळाचे सदस्य आणि इंडस एंटरप्रेन्योर्सचे (TiE) चार्टर सदस्य आहेत. ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे (ISB) संस्थापक बोर्ड सदस्य आहेत.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीAmericaअमेरिका