शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani: एकेकाळी चाळीत राहणारं गौतम अदानींचं कुटुंब; आज बनलंय आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:17 AM

1 / 10
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी(Gautam Adani) यांनी चीनच्या झोंग शैनशैन यांना मागे टाकून आशियातील दुसऱ्या नंबरचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. Bloomberg Billionaires नुसार अदानींची संपत्ती ६७.६ अब्ज डॉलर असून जगातील श्रीमंताच्या यादीत ते १४ व्या नंबरवर आहेत.
2 / 10
आशियात आता १ नंबरला मुकेश अंबानी आहेत. त्यांची संपत्ती ७६.३ अब्ज डॉलर आहे. यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत ३३.८ अब्ज डॉलरची भर पडली. ज्या वेगाने अदानी यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. ते पाहता पुढील काही दिवसांत गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे.
3 / 10
अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांचे मार्केट कॅप १ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. टाटा ग्रुप, रिलायन्सनंतर अदानी ग्रुप १०० अब्ज डॉलर मार्केट कॅपपर्यंत पोहचणारं देशातील तिसरं व्यावसायिक घराणं आहे.
4 / 10
अदानी यांचा व्यवसाय एअरपोर्ट्स, डेटा सेंटर्स, डिफेन्स सेंटर्स, पॉवर पॉईंट्स याचा आहे. मागील १ वर्षात अदानींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गौतम अदानी यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबादमध्ये २४ जून १९६२ मध्ये झाला. अदानी यांचे सहा भाऊ-बहिण आहेत.
5 / 10
अहमदाबादच्या पोल परिसरातील शेठ चाळीत ते राहत होते. गुजरात यूनिवर्सिटीतून बी कॉम पूर्ण न करता ते मुंबईला आले. आणि याठिकाणी त्यांनी डायमंड सॉर्टर म्हणून व्यवसायाला सुरूवात केली.
6 / 10
काही वर्षात मुंबईच्या झवेरी बाजारात गौतम अदानी यांनी स्वत:ची डायमंड ब्रोकरेज फर्म सुरू केली. त्यानंतर मुंबईत काही काळ घालवल्यानंतर ते पुन्हा भावाच्या पॅल्स्टिक फॅक्टरी काम करण्यासाठी अहमदाबादला आले. याठिकाणी पीवीसी म्हणजे पॉलिविनाइल क्लारोइड इंपोर्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लोबल ट्रेडिंगमध्ये एन्ट्री घेतली.
7 / 10
प्लॅस्टिक बनवण्यासाठी पीवीसीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पीवीसी Import मध्ये प्रगती झाली आणि १९८८ मध्ये अदानी ग्रुप पॉवर आणि एग्री कमोडिटीची अधिकृतपणे स्थापना झाली. १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांमुळे अदानी ग्रुपला प्रचंड फायदा झाला आणि ते आंतरराष्ट्रीय उद्योजक बनले
8 / 10
१९९५ गौतम अदानी यांच्यासाठी यशस्वी वर्ष ठरलं. जेव्हा त्यांच्या कंपनीला मुद्रा पोर्टचं व्यवस्थापन करण्याचं कंत्राट मिळालं. त्यानंतर गौतम अदानींनी त्यांच्या व्यवसायात विविधता आणली. १९९६ मध्ये अदानी पॉवर लिमिटेड अस्तित्वात आली त्यानंतर १० वर्षात कंपनी पॉवर जनरेशनच्या उद्योगात उतरली.
9 / 10
गौतम अदानी यांचा व्यवसाय अनेक क्षेत्रात पसरला आहे. कोळसा खदानीचे ते सर्वात मोठं ठेकेदार मानले जातात. आता गौतम अदानी यांची नजर सिमेंट कारखान्यापासून ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड कंस्ट्रक्शन, डिफेन्स प्रोडक्शन आणि रेल्वेवर आहे. अदानींनी ६-७ छोट्या रेल्वे लाईन एकत्रित करून रेल्वे ट्रक मॅनेजमेंट कंपनी बनवली आहे.
10 / 10
अदानी ग्रुप गेल्या २ वर्षाच्या काळात देशातील ७ विमानतळाचं व्यवस्थापन हाती घेतलं आहे. अदानी ग्रीन एनर्जीने २०२५ पर्यंत अक्षय उर्जा क्षमता आठ पटीने वाढवण्याचं निश्चित केले आहे. एसबी एनर्जीकडून २६ हजार कोटींचा खरेदी व्यवहार झाला आहे. या व्यवहारामुळे अदानी ग्रीनची क्षमता २४.,३०० मेगावॅट इतकी झाली आहे.
टॅग्स :AdaniअदानीMukesh Ambaniमुकेश अंबानी