शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Neerja Sethi : टाटांच्या कंपनीत नोकरी, नंतर एका फ्लॅटमधून सुरू केली फर्म; आज आहेत ८३९५ कोटींच्या मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 8:50 AM

1 / 7
Success Story: मनात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट मिळवणं कठीण नाही असं म्हणतात. यश मिळवायचं असेल तर अपार मेहनत करण्याची तयारी हवी. आज आपण अशाच एका महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांनी सुरुवातीच्या काळात टीसीएसमध्ये नोकरी केली. परंतु नंतर त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची कंपनी उभी केली.
2 / 7
नीरजा सेठी (Neerja Sethi) एकेकाळी रतन टाटा यांच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीत काम करत होत्या. परंतु नंतर त्यांनी आपल्या पतीसोबत मिळून घरातूनच सिंटेल नावाची आयटी कंपनी सुरू केली. २०१८ मध्ये सिंटेलला फ्रेंच आयटी कंपनीनं मोठ्या किंमतीत विकत घेतलं.
3 / 7
आज नीरजा सेठी यांची एकूण संपत्ती ८,३९५ कोटी रुपये आहे. त्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या यादीतही त्यांचं नाव अनेकदा समाविष्ट झाले आहे. भारतीय वंशाच्या उद्योजक नीरजा सेठी यांच्या प्रवासाबद्दल आज जाणून घेऊ.
4 / 7
नीरजा सेठी या भारतीय वंशाच्या महिला आहेत. स्वत:ची कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) काम केलंय. ६९ वर्षीय नीरजा आज अब्जाधीश आहेत. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १ अब्ज डॉलर (सुमारे ८३९५ कोटी रुपये) आहे.
5 / 7
नीरजा सेठी यांनी दिल्ली विद्यापीठातून गणित विषयात बॅचलर डिग्री आणि ऑपरेशन रिसर्चमध्ये एमबीए केलं आहे. त्यांनी ऑकलंड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतलीये. भरत देसाई असं त्यांच्या पतीचं नाव आहे. त्यांना दोन मुलंही आहेत. नीरजा आणि भरत यांची भेट अमेरिकेत टीसीएसमध्ये काम करत असताना झाली होती.
6 / 7
१९८० मध्ये नीरजा यांनी आपल्या पतीसोबत मिळून मिशिगनमधील ट्रॉय येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून केवळ २,००० डॉलर (आज सुमारे १.६ लाख रुपये) गुंतवणूक करून सिंटेलची सुरुवात केली. २०१८ मध्ये फ्रेन्च आयटी कंपनी अटोस एसईनं सिंटेलला ३.४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलं. नीरजा यांना या करारातील हिस्स्यासाठी अंदाजे ५१ कोटी डॉलर्स मिळाले. नीरजा १९८० पासून सिंटेलमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होत्या. परंतु, अधिग्रहणानंतर त्या एटीओएसमध्ये रुजू झाल्या नाही.
7 / 7
आज नीरजा सेठी फ्लोरिडाच्या फिशर आयलंडमध्ये राहतात. फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचा अनेकदा समावेश करण्यात आला आहे. जगभरात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी व्यवसाय विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहींनी शून्यातून तर काहींनी मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून स्वत:ची कंपनी सुरू केली. यातील अनेक महिला आज अब्जाधीश आहेत.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी