शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंबानी, टाटा, अदानी नाही; शरद पवारांच्या स्वप्नातील लवासाचा मालक कोण? कवडीमोलाने विकत घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 9:53 AM

1 / 11
लवासा म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या स्वप्नातील शहर, पवार बाहेरच्या देशाच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांना लवासा हिल स्टेशनची कल्पना सुचली. मुंबईवरुन पुण्याला जात असताना त्यांना मावळ जवळ जागाही मिळाली, मग इथून पुढे सुरू झाला लवासा हिल स्टेशनचा प्रवास. पण काही अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
2 / 11
आता हा प्रकल्प उद्योगपती अजय सिंह यांच्या डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीने विकत घेतला आहे. तेव्हापासून अजय सिंह हे चर्चेत आले आहेत.
3 / 11
अजय हरिनाथ सिंह हे मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने भारतातील पहिले खासगी हिल स्टेशन ताब्यात घेण्याची आणि नूतनीकरणाची बोली जिंकली. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने लवासासाठी डार्विन प्लॅटफॉर्मच्या १,८१४ कोटी रुपये रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली होती.
4 / 11
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने या वर्षी जुलैमध्ये लवासा स्मार्ट सिटीबाबत निर्णय दिला होता. NCLT ने अजय हरिनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपला हा प्रकल्प प्रदान केला.
5 / 11
दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी, न्यायाधिकरणाने लवासा या खासगी हिल स्टेशनसाठी १,८१४ कोटी रुपयांच्या ठराव योजनेला मंजुरी दिली. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड लवासा कॉर्पोरेशनसाठी विजयी बोलीदार ठरले. लवासा कॉर्पोरेशन प्रामुख्याने पुण्यात याच नावाने खासगी हिल स्टेशन विकसित करण्याच्या व्यवसाय करत आहे.
6 / 11
लवासा मुंबईपासून १८० किमी अंतरावर असलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांच्या सुंदर मुळशी खोऱ्यात २०,००० एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला आहे. लवासा हा पहिला खासगी शहराशी जोडलेला प्रकल्प आहे.
7 / 11
HCC द्वारे २००० मध्ये सुरू केलेला लवासा प्रकल्प अनेक वर्षांपासून भूसंपादन आणि पर्यावरणविषयक नियमांवरील विविध वादांमध्ये अडकला. त्याच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया 2018 मध्ये सुरू झाली. ज्या लोकांनी यात गुंतवणूक केली होती, ते त्यांचे पैसे परत मिळण्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. यामध्ये प्रकल्पातील घरे खरेदी करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
8 / 11
डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपची स्थापना अजय हरिनाथ सिंह यांनी २०१० मध्ये केली होती. DPIL पायाभूत सुविधा करार अशी काम ही कंपनी करत आहे. हा समूह पायाभूत सुविधा, रिफायनरीज, किरकोळ आणि आदरातिथ्य अशा विविध क्षेत्रात सेवा प्रदान करते.
9 / 11
लवासा प्रकल्प मिळविल्यानंतर अजय हरिनाथ सिंह यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, त्यांचा समूह राष्ट्र उभारणीसाठी वचनबद्ध आहे. भारताला आर्थिक शक्तीस्थान बनवण्याच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या ध्येयाशी तिची दृष्टी पूर्णपणे सुसंगत आहे. NCLT ने त्यांना देशातील महत्त्वाकांक्षी जागतिक दर्जाचे स्मार्ट सिटी विकसित करण्याचे आव्हानात्मक काम सोपवले आहेत. या निर्णयामुळे त्यांची राष्ट्र उभारणीची बांधिलकी आणखी मजबूत होईल, असं त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
10 / 11
समूहाच्या ११ पेक्षा जास्त देशांमध्ये किमान २१ लिस्टेड कंपन्या आहेत. अजय सिंह हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. लवासा व्यतिरिक्त, अजय यांच्या डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपने जेट एअरवेज आणि एअर इंडियासह एअरलाइन्ससह शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिग्रहणासाठी उच्च-प्रोफाइल बोली प्रक्रियेत भाग घेतला होता.
11 / 11
२०२२ मध्ये ते कर्जबाजारी अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटल खरेदी करण्याच्या शर्यतीत सामील होते. त्यांच्या समूहाची एकूण संपत्ती सुमारे ६८,००० कोटी रुपये आहे.
टॅग्स :businessव्यवसायPuneपुणे